कमालच झाली, आजोबांनी केले कोरोनाला चीतपट...

corona
corona

राहू (पुणे) : दौंड तालुक्‍यातील पहिले कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोरोनावर मात केली असून, 17 दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी आज (ता. 16) दिली. 

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची बाधा झालेला पहिला रुग्ण 9 मार्च रोजी पुणे येथे आढळून आला होता. त्यानंतर तब्बल 51 दिवस उलटल्यानंतर दौंड तालुक्‍यातील दहिटणे येथे 29 एप्रिल रोजी 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते.

या नागरिकाच्या संपर्कातील नागरिक, बाधा होण्यापूर्वी उपचार करणारे खासगी रुग्णालयाचे डॉक्‍टर व कर्मचारी असे एकूण 23 जणांची घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता, ते सर्व निगेटिव्ह आले होते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, मागील आठवड्यात या कोरोनाबाधित नागरिकास अतिदक्षता विभागातून बाहेर आणून प्राणवायू दिला जात होता. आज त्यांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांना श्वसनाच्या थोडा त्रास होत असल्याने दोन दिवसांत रुग्णालयातून सोडले जाणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com