esakal | शिफ्ट संपली की जबाबदारी संपली; पुण्यात खाकी वर्दीच्या बेपर्वाईने 'त्या' रुग्णाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

In Pune a patient died due to negligence of Police Officer

नाना पेठेतील अत्यवस्थ रुग्णाला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 108 या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या कंट्रोल रूममध्ये दोन कॉल आले होते. त्यापैकी एक कॉल पोलिसांनी केला होता. तर, दुसरा तेथील नागरिकांनी केल्याची माहिती नियंत्रण कक्षातून मिळाली. हे दोन्ही कॉल्सही जवळपास एकाच वेळी म्हणजे मध्य रात्री दोन-अडीच वाजता आले. 

शिफ्ट संपली की जबाबदारी संपली; पुण्यात खाकी वर्दीच्या बेपर्वाईने 'त्या' रुग्णाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : ''शिफ्ट संपली की जबाबादारी संपली या खाकी वर्दीच्या बेपर्वाई मानसिकतेमुळे अत्यवस्थ रुग्णाला प्राण गमवावे लागले,'' अशी खळबळजनक माहिती आता पुढे येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
नाना पेठेतीलअत्यवस्थ रुग्णाला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 108 या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या कंट्रोल रूममध्ये दोन कॉल आले होते. त्यापैकी एक कॉल पोलिसांनी केला होता. तर, दुसरा तेथील नागरिकांनी केल्याची माहिती नियंत्रण कक्षातून मिळाली. हे दोन्ही कॉल्सही जवळपास एकाच वेळी म्हणजे मध्य रात्री दोन-अडीच वाजता आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत बीव्हजी 108चे आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे (इएमएस) चिफ ऑपरेटींग ऑफिसर (सीओओ) डॉ. ज्ञानेश्वर शेळके म्हणाले, “पोलिसांनी कॉल केल्यानंतर 108ची रुग्णवाहिका 15 ते 20 मिनीटांमध्ये घटनास्थळावर पोचली. वीस मिनीट रुग्णवाहिका घटनास्थळावर थांबली होती. पोलिसांनी ज्या फोननंबरवरून 108ला रुग्णाची माहिती देणारा फोन केला होता, त्याच्यावर रुग्णवाहिकेच्या चालकाने संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण, पोलिसांचा मोबाईल फोन कनेक्ट झाला नाही. त्यामुळे घटनास्थळावर रुग्ण नेमका कुठे आहे, हे सापडत असल्याची माहिती रुग्णवाहिकेच्या चालकाने परत कंट्रोल रुमला दिली आणि 20 मिनीटांनंतर नाना पेठ भागातील घटनास्थळ सोडले. या भागात सगळीकडे बँरिगेटस् टाकून रस्ते बंद केले होते. त्यामुळे रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. या प्रकरणात पोलिसांशी चर्चा झाली आहे. त्यात पोलिसांनी सांगितले की, या दरम्यान पोलिसांची शिफ्ट संपली त्यामुळे ते तेथून गेले.”

 हृदय पिळवटून टाकणारी कहाणी : '...ते माहीत नाही, पण आमचे मात्र कुटुंब उद्‌ध्वस्त झाले'

याच दरम्यान, तेथील नागरिकांनीही फोन केला होता. पण, फोनवरून 108च्या कंट्रोल रुमला माहिती देताना रुग्णाचा मृत्यू झाला आहे आणि मृतदेह घेऊन जायचा आहे, असे सांगण्यात आले, असल्याचीही डॉ. शेळके यांनी स्पष्ट केले.

पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू |

loading image
go to top