दुर्गम वेल्ह्याला मोठा दिलासा, तेरा जणांचे अहवाल निगेटिव्ह

corona
corona
Updated on

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील कादवे येथील तेरा जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.


वेल्हे तालुक्यामध्ये आरोग्य विभागाकडुन गावांमध्ये सर्वेक्षण चालू असताना कादवे येथील एका ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची लक्षणे आढळली. त्यामुळे या महिलेची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये या महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे २३ जून रोजी स्पष्ट झाले. या महिलेच्या घरी पुण्यातील नातेवाईकांचा मुक्काम झाला होता, तर या घरातील व्यक्ती पुणे शहरातून जा ये करत असल्याची माहिती समोर आली होती. 

संबधित महिलेच्या संपर्कातील चौदा व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये तेरा जणांची टेस्ट निगेटिव्ह, तर महिलेच्या घरातील आणखी एका महिलेस बाधा झाल्याचे २४ जून रोजी निष्पन्न होते, तर त्यांच्या संपर्कातील आणखी तेरा जणांचे स्वॅब (घशातील द्राव) वेल्हे येथील कोवीड केअर सेंटरमध्ये घेतले. ते २५ जुन रोजी तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा तपासणी अहवाल आज आला. त्यात तेरा जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


वेल्हे तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३५ झाली असून, त्यापैकी ३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर तीन बाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती वेल्हे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com