esakal | इंदापुरातील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील १६ जणांचे अहवाल... 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

इ्ंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील २८ नागरिकांचे अहवाल गेल्या दोन दिवसांमध्ये आले आहेत. त्यामुळे नागरिकांना 

इंदापुरातील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील १६ जणांचे अहवाल... 

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील  जंक्शन, कळंब (लालपुरी) व  शेळगाव येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . त्यामुळे तालुक्यातील कोरोनाची साखळी तुटण्यास सुरवात झाली आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नागरिकांना हा दिलासा आहे.

पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

जंक्शन व शेळगावमध्ये कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. दोन्ही रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांपैकी आठ जणांचा अहवाल चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागरिक घाबरले होते. शेळगावमधील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या १२ नागरिकांच्या घशातील नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, एका नागरिकाचा अहवाल उद्या येणार आहे. तसेच, जंक्शनमधील कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील तिघांचा व कळंबजवळील लालपुरीमधील कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. काल (ता. ३) जंक्शन येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील २ महिलांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. 

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ

इ्ंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील २८ नागरिकांचे अहवाल गेल्या दोन दिवसांमध्ये निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, कोरोनाची साखळी तुटू लागली आहे.