esakal | या सोळा जणांच्या कोरोनाच्या अहवालामुळे वेल्ह्यातील नागरिकांना... 
sakal

बोलून बातमी शोधा

corona1

कोवीड केअर सेंटरमधीलच डॉक्टरच बाधित असल्याने तालुका प्रशासनच मोठे चिंतेत पडले होते,

या सोळा जणांच्या कोरोनाच्या अहवालामुळे वेल्ह्यातील नागरिकांना... 

sakal_logo
By
मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमधील कोरोनाबाधित महिला डॉक्टरच्या संपर्कातील आरोग्य विभागातील बारा जणांचे व मुंबई कनेक्शनमधून बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील कोळवडी गावातील चार जण, असे सोळा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे वेल्हेप्रशासनासह नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमोल कोल्हे सांगतात, कोरोनाच्या लढाईत...माझी ढाल, माझा मास्क...

वेल्हे येथील कोवीड केअर सेंटरमधील ३५ वर्षीय महिला डॉक्टरच्या पतीला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर महिला डॉक्टरची कोरोना तपासणी करण्यात आली होती. यामध्ये तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.  त्यानंतर संपर्कातील वेल्हे आरोग्य विभागातील बारा कर्मचा-यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. कोवीड केअर सेंटरमधीलच डॉक्टरच बाधित असल्याने तालुका प्रशासनच मोठे चिंतेत पडले होते, तर कोळवडी येथील मुंबई कनेक्शनमधून बाधित झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील चार व्यक्तींचे स्वॅब गुरूवारी (ता. ९) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

एका लग्नाची मोठी गोष्ट...वऱ्हाडींसह नवरा- नवरीचंही जुळलं कोरोनाशी नातं 

या सोळा जणांचे तपासणी अहवाल काल निगेटिव्ह आले. त्यामुळे तालुका प्रशासनासह वेल्हे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेल्हे तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३८ वर पोहचला असून, त्यापैकी ३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. साखर गावातील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला असून, कातवडी व कोळवडी येथील प्रत्येकी एक रुग्णावर उपचार चालू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अंबादास देवकर यांनी दिली.
 
Edited by : Nilesh Shende

loading image