पुणेकरांनो, आता बेशिस्तपणा नको! विनाकारण रात्री हिंडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई 

pune police
pune police

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शहरात दररोज रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत संचार मनाई आदेश लागू करण्यात आला आहे, असा आदेश सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला. पोलिसांकडून विनाकारण त्रास दिला जाणार नाही, मात्र नागरिकांनीही रात्री विनाकारण फिरू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही डॉ. शिसवे यांनी स्पष्ट केले. संबंधित आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 188 नुसार (आदेश धुडकावणे) तसेच साथरोग अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही डॉ. शिसवे यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. रविवारी रात्री आठ वाजल्यापासून संचार मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत दररोज रात्री आठ ते सकाळी सात यावेळेत संबंधित आदेश लागू असणार आहेत. संचारबंदीचे आदेश लागू केल्यानंतर महत्वाच्या कारणांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची अडवणूक करण्यात येऊ नये, असे आदेश शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रमुखांना देण्यात आले आहेत. 

  • अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडणाऱ्यांनी रात्री ओळखपत्र बाळगावे. 
  • कामगारांनी कार्यालयीन ओळखपत्र व प्रवाशांनी तिकीटे, कागदपत्रे जवळ ठेवावीत. 
  • नागरीकांनी कोणत्याही सबळ कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. 
  • विनाकारण शहरामध्ये फिरल्याचे आढळल्यास होणार कारवाई 

हेही वाचा - कात्रज स्माशानभूमीत होतेय मृतांच्या नातेवाईकांची वारेमाप लूट!
नागरिकांनी रात्री पूर्वी घरी पोचता येईल, यादृष्टीने नागरीकांनी आपल्या कामांच्या वेळा सुधारून घ्यावात. तसेच रात्री कामावरुन घरी परतणाऱ्या कामगार, तसेच प्रवाशांनी स्वतःजवळ ओळखपत्रे, तिकटे किंवा आवश्‍यक कागदपत्रे ठेवावीत. कोरोनाबाबत प्रशासनाकडून वारंवार आव्हान करूनही नागरिक गांभीर्याने घेत नाहीत, त्यामुळेच सध्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यावर आत्ता नियंत्रण आले नाही, तर कडक निर्णय घ्यावे लागतील. पुणेकर सुजाण आहेत. त्यांनी पुर्वीप्रमाणेच यावेळीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे.'

- डॉ.रविंद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com