esakal | भिगवण : कोरोना रुग्नाच्या संपर्कातील 'त्या' २२ व्यक्तींची तपासणी; ३ किलोमीटरचा परिसर केला सील!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Test

तीन किलोमीटर परिसरातील नागरिकांना कोरोना किंवा इतर आजाराची लक्षणे आहेत का याची चौकशी करण्यात आली आहे.

भिगवण : कोरोना रुग्नाच्या संपर्कातील 'त्या' २२ व्यक्तींची तपासणी; ३ किलोमीटरचा परिसर केला सील!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिगवण : भिगवण स्टेशन येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या ८ नातेवाईक आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपाचार घेतलेल्या हॉस्पिटलमधील १४ अशा एकूण २२ व्यक्तींच्या घशातील द्रव्य तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. या अहवालाकडे सर्वाचे लक्ष लागले असून त्यावर भिगवणमधील कोरोनाची वाटचाल ठरणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंगळवारी(ता.२८) भिगवण स्टेशन येथील महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर प्रशासनाने महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना होम कोरंटाईन करण्यात आले होते. बुधवारी महिलेच्या नातेवाईक आठ नातेवाईक व महिलेवर उपचार केलेल्या येथील खासगी रुग्नालयातील १४ व्यक्तींचे घशातील द्रव्य तपासणीसाठी पुणे य़ेथे पाठविण्यात आले.

- ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास

दरम्यान बुधवारी(ता.२९) पुन्हा प्राताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार सोनाली मेटकरी, तालुका वैदयकिय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ आदींनी बैठक घेऊन भिगवण स्टेशन पासुन तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये अंगणवाडी सेविका, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांचे माध्यमातून सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली. यामध्ये तीन किलोमीटर परिसरातील नागरिकांना कोरोना किंवा इतर आजाराची लक्षणे आहेत का याची चौकशी करण्यात आली आहे. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल बुधवारी रात्री उशिरापर्यंत किंवा गुरुवारी सकाळी येणे अपेक्षित आहे. 

- Coronavirus : पुण्याच्या महापौरांचे पत्र व्हायरल; रोहित पवारांनी केला खुलासा

भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ परिसर सिल करण्यात आला आहे. केवळ दवाखाने व मेडिकल दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून किराणा आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दुकानदारास घरपोच सेवा देण्याची सूचना देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे येथील राज्य राखीव दलाच्या जवानांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे.

- #Lockdown2.0 : लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा 'या' विभागाला; वाचा सविस्तर

loading image