लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरसह चौघांचे रिपोर्ट...

राजकुमार थोरात
Sunday, 12 July 2020

लासुर्णे (ता.इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह चौघांचा अहवाल निगेटिव्ह व एका नर्सचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

 

वालचंदनगर : लासुर्णे (ता.इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह चौघांचा अहवाल निगेटिव्ह व एका नर्सचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २२ आमदार दिल्लीत 

लासुर्णेमधील नर्सला दोन दिवसापूर्वी कोरानाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर  नर्सच्या संपर्कामध्ये आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी,  फॉर्मासिस्ट, आरोग्य सेवक व दोन नर्सचे स्वॅब (घशातील द्रवाचे नमुने) बारामतीमधील कोविड सेंटरला तपासणीसाठी शनिवार (ता.११) रोजी देण्यात आले होते.

तसेच आज उर्वरित १८ कर्मचाऱ्यांचे स्वॅब इंदापूर कोविड सेंटरला देण्यात आले आहे. बारामतीमध्ये देण्यात आलेल्या ५ स्वॅब चा अहवाल आला असून वैद्यकीय अधिकाऱ्यासह चौघांजणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तर एक नर्सचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या नर्सच्या पतीचा अहवाल आज रविवारी (ता.१२) रोजी दुपारी पॉझिटिव्ह आला आहे. संबधित नर्सकडे नेमणूक इंदापूर तालुक्यातील बोरी गावामध्ये असून गावातील लो-रिस्कमधील नागरिकांचे यादी बनविण्याचे काम सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona test of four at Lasurne was negative