पुण्यात २१ ठिकाणी होणार कोरोना चाचण्या; कोठे ते पहा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रुग्णांचा शोध घेऊन त्यांना लगेच विलग करण्यासाठी चाचणी केंद्रे वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. संसर्ग वाढीचा वेग पाहून कोथरूड, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी आणि नगर रस्त्यावर नव्याने चार केंद्रे सुरू होतील.

कोथरूड, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी आणि नगर रस्त्यावर नवीन केंद्रे
पुणे - शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रुग्णांचा शोध घेऊन त्यांना लगेच विलग करण्यासाठी चाचणी केंद्रे वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. संसर्ग वाढीचा वेग पाहून कोथरूड, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी आणि नगर रस्त्यावर नव्याने चार केंद्रे सुरू होतील. त्यामुळे आता विविध भागांत २१ ठिकाणी कोरोना चाचण्या होणार आहेत. 

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसह काही खासगी जागांत ही केंद्रे असून, त्याठिकाणी मोफत चाचणी केली जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर आणि ती वाढल्यानंतर एप्रिल, मे महिन्यांपासून क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर चाचण्यांची सुविधा पुरविण्यात आली. मात्र, नोव्हेंबरपासून ही साथ कमी झाल्याने काही केंद्रे बंद करण्यात आली होती.

सिंहगड परिसर सुन्न:दोन वर्षांच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या, नराधमाला रायगड जिल्ह्यातून अटक

ज्या ठिकाणी केंद्रे आहेत, त्याठिकाणीही चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली होती. परंतु, गेल्या दहा दिवसांत रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नव्याने आरोग्य यंत्रणा सक्षम करून नव्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून चाचण्यांची संख्या वाढवून ती आता पाच हजारापर्यंत नेली जाणार आहे. यानुसार बुधवारी आणि गुरुवारी साडेचार हजार चाचण्या करण्यात आल्या.

'राज्यपालांचा मी लाडका मंत्री, पण वाद सोडवू शकत नाही'

सध्या १७ ठिकाणी ‘आरटीपीसीआर’, ‘ॲटिजेन’ चाचण्या करण्यात येत आहेत. परंतु, कोथरूड, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता आणि नगर रस्ता परिसरात रुग्ण वाढत आहेत. तेथील रहिवाशांच्या सोयीसाठी नवी चाचणी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona tests to be held at 21 places in Pune