Corona Update : पुणे जिल्ह्यात आज ८३० नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील तीन, पिंपरी चिंचवडमधील चार आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन जण आहेत. नगरपालिका आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.

पुणे : पुणे जिल्ह्यात  रवाना (ता.२९ ) दिवसभरात ८३०  नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांत शहरातील ४०० रुग्ण आहेत. आज दिवसभरात ८ हजार ८२  कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या २४  तासांत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय ६२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील आठ दिवसांपासुन रोज दिवसभरातील नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण कमीच होत आहे. आजही हे प्रमाण कमीच आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील तीन, पिंपरी चिंचवडमधील चार आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन जण आहेत. नगरपालिका आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात ४ हजार ४५७ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच ७ हजार २१० रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ४२ हजार ३७० झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख २२  हजार ४७७ कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 403 रुग्ण आहेत.

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी

आज पिंपरी चिंचवडमध्ये १९२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १७०, नगरपालिका क्षेत्रात ५७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ११ नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.२८) रात्री आठ वाजल्यापासून आज (ता. २९) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update 830 new patients in Pune district today