esakal | Good News : पुण्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढली; नवीन रुग्णही कमी

बोलून बातमी शोधा

पुण्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढली; नवीन रुग्णही कमी
सलग सहाव्या दिवशी शहरातील दररोजच्या नवीन रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे.
पुण्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढली; नवीन रुग्णही कमी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - पुणे शहरातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ८५३ ने कमी झाली आहे. मागील पाच दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्ण संख्या सातत्याने कमी होत आहे. यामुळे पाच दिवसांपूर्वी असलेली एकूण रुग्णसंख्या आज ३ हजार ५०५ ने कमी झाली आहे. आज सलग सहाव्या दिवशी शहरातील दररोजच्या नवीन रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. आज शहरात ३ हजार ९९१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याउलट ४ हजार ७८९ कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे शहरातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या पाच दिवसांपूर्वी म्हणजेच २० एप्रिलला ५२ हजार ९७७ इतकी होती. आज ती ४९ हजार ४७२ झाली आहे. शुक्रवारी (काल) हीच संख्या ५० हजार ३२५ इतकी होती. दरम्यान, पुणे जिल्ह्यात आज ९ हजार ९८९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून ८ हजार ८५३ कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य १३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: रेमडेसिव्हिर, लसीसाठी जागतिक निविदा काढणार : उपमुख्यमंत्री

आजच्या एकूण रुग्णांत शहरातील सर्वाधिक रुग्णाबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ४७३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २ हजार ७२१, नगरपालिका क्षेत्रात ६४३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

शहरातील गेल्या पाच दिवसांतील रुग्ण

२० एप्रिल - ५२ हजार ९७७.

२१ एप्रिल - ५१ हजार ९२०.

२२ एप्रिल - ५१ हजार ५५२.

२३ एप्रिल - ५० हजार ३२५.

२४ एप्रिल - ४९ हजार ४७२.