esakal | रेमडेसिव्हिर, लसीसाठी जागतिक निविदा काढणार : उपमुख्यमंत्री

बोलून बातमी शोधा

ajit pawar

रेमडेसिव्हिर, लसीसाठी जागतिक निविदा काढणार : उपमुख्यमंत्री

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना येत्या महाराष्ट्रदिनापासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येईल. प्रसंगी परदेशातून लस आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स आयात करण्यात येतील. तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यानुसार या लस आणि इंजेक्शनसाठी जागतिक निविदा (ग्लोबल टेंडर) काढण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. या जागतिक निविदांसाठी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला खरेदीबाबत चे सर्वाधिक देण्यात आल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. या समितीत वित्त, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि औद्योगिक विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य असणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पवार म्हणाले, "कोरोना प्रतिबंधासाठी १८ वर्षापुढील सर्व नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी पुणे जिल्ह्याने दररोज १ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे उद्दिष्ट ८५ हजारांपर्यंत पुर्ण झाले. पण नंतर लसीचा पुरवठा कमी झाला. लस, रेमडेसिविर इंजेक्शन्स व ऑक्सीजनचा पुरवठा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. सध्या केंद्र सरकारने रेमडेसिविर पुरवठ्यात ११ हजारांनी तर, जामनगर येथून मिळणाऱ्या ऑक्सीजनच्या पुरवठ्यात प्रतिदिन १२५ मेट्रिक टनांची कपात केली आहे."

हेही वाचा: छातीत दुखत आहे.... पुणे पोलिस म्हणतात पुरावा द्या !

जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे २० प्रकल्प

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध व्हावा, यासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी मिळून २० आॅक्सीजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात. येणार आहेत. यापैकी १० प्रकल्पांना जिल्हा नियोजन समितीतून, सहा प्रकल्पांना पुणे महापालिका आणि चार प्रकल्पांना पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत निधी उपलब्ध होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.