esakal | पुणे : 24 तासात 11 हजार 661 नवे रुग्ण; 159 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona In Pune

राज्यात दिवसभरात 56 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असून 51 हजार 356 जण कोरोनामुक्त झाले.

पुणे : 24 तासात 11 हजार 661 नवे रुग्ण; 159 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - राज्यात दिवसभरात 56 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असून 51 हजार 356 जण कोरोनामुक्त झाले. पुणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात एका दिवसात 11 हजार 661 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 159 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 9 हजार 566 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 8 लाख 60 हजार 844 जण कोरोनाबाधित झाले असून 13 हजार 396 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 7 लाख 48 हजार 870 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 98 हजार 746 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुणे शहरात रविवारी नवीन 4 हजार 44 रुग्ण सापडले असून आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 78 हजार 472 इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 66 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 6 हजार 930 इतकी झाली आहे. उपचार घेणाऱ्या 42 हजार 229 रुग्णांपैकी 1 हजार 401 रुग्ण गंभीर तर ६,७७४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. शहरातील 4 हजार 656 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 3 लाख 78 हजार 472 झाली आहे.

हेही वाचा: Corona : राज्यात मृतांच्या संख्येत वाढ; नव्या रुग्णात घट

राज्यात मृतांचा आकडा वाढला आहे. दिवसभरात 669 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये मुंबई मनपा येथे सर्वाधिक 79 मृत्यूची नोंद झाली. पुणे मनपा 53 ,सोलापूर मनपा 30, यवतमाळ 28, सांगली येथे 25 मृत्यू नोंदवण्यात आले. राज्यातील मृत्यूचा दर 1.49 % इतका आहे.

नव्या रुग्णांचा आकडा गेल्या आठवड्याभरातील रुग्ण संख्येपेक्षा काहीसा कमी झाला आहे. दिवसभरात 56 हजार 648 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 47 लाख 22 हजार 401 झाली आहे.

loading image
go to top