esakal | Corona Update : राज्यात मृतांच्या संख्येत वाढ; नव्या रुग्णांमध्ये घट

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून आज राज्यात मृतांचा आकडा वाढला आहे.

Corona : राज्यात मृतांच्या संख्येत वाढ; नव्या रुग्णात घट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून आज राज्यात मृतांचा आकडा वाढला आहे. दिवसभरात 669 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये मुंबई मनपा येथे सर्वाधिक 79 मृत्यूची नोंद झाली. पुणे मनपा 53 ,सोलापूर मनपा 30, यवतमाळ 28, सांगली येथे 25 मृत्यू नोंदवण्यात आले. राज्यातील मृत्यूचा दर 1.49 % इतका आहे. 

नव्या रुग्णांचा आकडा गेल्या आठवड्याभरातील रुग्ण संख्येपेक्षा काहीसा कमी झाला आहे. दिवसभरात 56 हजार 648 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 47 लाख 22 हजार 401 झाली आहे. 

हेही वाचा: बंगालमध्ये रडीचा डाव; शरद पवारांचा भाजपवर निशाणा

गेल्या 24 तासात नोंद झालेल्या 669 मृत्यूंपैकी 350 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 153 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. तर 166 मृत्यू हे आठवड्यापेक्षा आधीचे आहेत. सध्या राज्यात 6 लाख 68 हजार 353 सक्रीय रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 76 लाख 52 हजार 758 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 47 लाख 22 हजार 401 (17.08 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39 लाख 96 हजार 946 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसंच 27 हजार 735 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा: केरळची प्रगती एलडीएफ करेल; सुळेंनी शुभेच्छा देत व्यक्त केला विश्वास

दिवसभरात 51,356  रुग्ण कोरोनामुक्त

रविवारी दिवसभरात 51 हजार 356 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 39 लाख 81 हजार 658 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.31 % एवढे झाले आहे.