बारामतीत एकाच दिवशी 30 रुग्ण पॉझिटीव्ह

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

बारामतीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णसंख्या 503 इतकी झाली आहे. 

बारामती - कोरोना रुग्णांच्या संख्येचा आज बारामतीत परत उद्रेक झाला. एकाच दिवशी 30 पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने बारामतीत खळबळ माजली आहे. यात बारामतीतील 17 तर ग्रामीण भागातील 13 रुग्णांचा समावेश आहे. या मुळे बारामतीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णसंख्या 503 इतकी झाली आहे. 

गुरुवारी (ता. 20) घेतलेल्या 138 पैकी 118 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. यात बारामती शहरातील 9 व ग्रामीण भागातील 8 असे सतरा जण आरटीपीसीआर टेस्टमध्ये तर खाजगी प्रयोग शाळेत रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये शहरातील 8 व ग्रामीण भागातील 5 अशा 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

शहरातील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आमराई, तांदुळवाडी, सूर्यनगरी, कसबा, डॉमिनोज शेजारी, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, तांदूळवाडी येथील  तर तालुक्यातील पणदरे येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील एकाच कुटुंबातील सहा जण व काटेवाडी येथील 2 असे ग्रामीण भागातील आठ असे एकूण 17 रुग्ण rt-pcr पॉझिटिव्ह आले आहेत.

हे वाचा - पुण्यात कोरोनाचा धोका वाढतोय; सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ३ हजारापार

बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये  काल एकूण 45  नमुने अँटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी शहरातील आठ व ग्रामीण भागातील 5 असे 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील देसाई इस्टेट, अशोक नगर, सिद्धार्थ नगर हौसिंग सोसायटी, अंबिका नगर ,हरिकृपा नगर, नक्षत्र गार्डन, संघवीनगर तांदुळवाडी येथील आठ रुग्ण व करंजेपूल, माळेगाव, कोऱ्हाळे बुद्रुक व कांबळेश्वर येथील पाच रुग्ण अँटीजेन पॉझिटिव्ह आढळले आहेत.  त्यामुळे काल दिवसभरात एकूण 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व बारामतीची रुग्ण संख्या 503 झाले आहे  त्याचप्रमाणे कालपर्यंत बारामतीतून बरे झालेल्यांची संख्या 244 असून आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घाबरु नका पण काळजी घ्या
त्यामुळे बारामतीकरांना प्रशासना मार्फत आवाहन करण्यात येते की कोरोनाला घाबरू नका परंतु काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका तसेच 60  वर्षावरील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये व घरांमध्ये सुद्धा अलगीकरणामध्ये राहावे तसेच  इतरांनी सुद्धा कामासाठी बाहेर पडताना मास्क वापरावा, सॅनीटायजरचा वापर करावा व सोशल डिस्टंसिंग पाळावे,


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates baramati cross 500 patient