esakal | आंबेगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे काम वेगात सुरू

बोलून बातमी शोधा

आंबेगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे काम वेगात सुरू}

रोज एक हजार जणांना लस; आतापर्यंत 5 हजार ४८१ जणांना लस देण्यात आली आहे.

आंबेगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे काम वेगात सुरू
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लस आतापर्यंत एकूण पाच हजार ४८१ जणांना देण्यात आली आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात आता पर्यंत सर्वाधिक तीन हजार ८२२ जणांनी लस घेतली आहे. घोडेगाव ग्रामीण रुग्णालय, निरगुडसर, महाळुंगे पडवळ, डिंभे, धामणी, पेठ, तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच गेटवेल हॉस्पिटल मंचर व भीमाशंकर वडगाव काशिंबेग या खासगी हॉस्पिटलमध्ये ही लस देण्याची व्यवस्था सुरु केली आहे. सध्या रोज एक हजाराहून अधिक रुग्णांना लस उपलब्ध होत आहे. आंबेगाव तालुक्यात प्रतिबंधात्मक लस देण्याचे काम गतिमान पद्धतीने सुरू आहे.

केवळ एका गोष्टीच्या मदतीने आपण आपली सर्व उद्दिष्टे पूर्ण करू शकता ! जाणून घ्या...

मागील काळात कोरोना साथीने थैमान घातले होते. सुरुवातीला उपचार नसल्याने पुणे मुंबईमध्ये बाधित रुग्णांना उपचारासाठी धाव घ्यावी लागत होती. मे २०२० मध्ये मंचर शहरातील बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढू लागली होती. राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी प्रशासनासमवेत बैठक घेवून मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे रुपांतर कोविड रुग्णालयात केले. ऑक्सिजन तीस बेडची सुविधा सुरु केली. त्यानंतर रुग्णांना दिलासा मिळाला.  

दरम्यान, जूनमध्ये तर बाधित रुग्णांची संख्या हाताबाहेर गेली होती. उपजिल्हा रुग्णालयात बेड कमी पडत होते. जनतेच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागत होते. दर आठवड्याला वळसे पाटील बैठक घेवून झालेल्या नियोजनाचा आढावा घेत होते. प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर, कार्यकारी अभियंता बप्पा बहिर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी अहोरात्र परिश्रम घेवून ऑक्सिजन प्लांट उभारला. १०० ऑक्सिजन बेडचे व दहा व्हेंटिलेटर बेड कार्यान्वित केले.

अवसरी खुर्द येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयात ७०० बेडचे कोविड केअर सेंटर, भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल (वडगाव काशिंबेग), खेडकर, संजीवनी, मंचर सिटी, गुजराथी (मंचर) व आधार चव्हाण हॉस्पिटल (पारगाव-शिंगवे) येथे एकूण १०० ऑक्सिजन बेडची सुविधा सुरु झाली. रेमेडीसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा दूर होण्यासाठी मंचरमध्ये सदर इंजेक्शन मेडिकल स्टोरमध्ये व उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली. गोवर्धन दुध प्रकल्पाचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी करून या कालावधीत केलेले काम नेत्रदीपक आहे. रुग्णांना व गरीब कुटुंबाना नाश्ता व भोजन व्यवस्था करण्यात आली. आजही कोविड प्रतिबंधक लस घेणाऱ्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात जेवण व नाश्त्याची व्यवस्था शहा यांच्या वतीने सुरु आहे.

केवळ एका गोष्टीच्या मदतीने आपण आपली सर्व उद्दिष्टे पूर्ण करू शकता ! जाणून घ्या...

आंबेगाव तालुका
कोरोना बाधित रुग्ण : पाच हजार ४९
बरे झालेले रुग्ण : चार हजार ८३७
मृत्यू झालेले रुग्ण : १२१
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : ९१ 
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेले रुग्ण : पाच हजार ४८१

(संपादन : सागर डी. शेलार)