esakal | बारामतीत खळबळ, या प्रमुख हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यास कोरोना...
sakal

बोलून बातमी शोधा

corona1

बारामती शहरातील रुई ग्रामीण रुग्णालयातील सफाई कर्मचा-यासच कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले. आज दिवसभरात सात रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाल्याने आता बारामतीच्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 122 वर जाऊन पोहोचला आहे.

बारामतीत खळबळ, या प्रमुख हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यास कोरोना...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील रुई ग्रामीण रुग्णालयातील सफाई कर्मचा-यासच कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले. आज दिवसभरात सात रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाल्याने आता बारामतीच्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 122 वर जाऊन पोहोचला आहे. आज पणदरे येथील जगताप वस्तीवरील 56 वर्षांचे एक व्यक्ती, पाटस रस्त्यावरील एक युवक व रुई रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाली आहे. 

आठ याचिकाकर्ते विरूद्ध ठाकरे सरकार, सुनवाणीकडे राज्याचे लक्ष

रुई ग्रामीण रुग्णालयातील सफाई कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळल्याने आज खळबळ माजली आहे. कोरोनाची लागण वेगाने होत असून, हा दर कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. बारामतीतील कोरोनाबाधितांची संख्या 122 वर पोहोचली असून, त्या पैकी 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या मध्ये 62 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून, 49 रुग्ण उपचार घेत आहेत.  

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामतीतील लॉकडाउन संपल्यानंतर शहरात दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता गर्दी नियंत्रित ठेवून कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. शहरातील रुग्णांना पुण्याला जावे लागू नये, या साठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केलेली असून, व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजनची कमतरता भासू नये व पुरेसे बेड उपलब्ध असावेत, या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. 

कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्याच्या उददेशाने बारामती तालुक्यात जनजागृती मोहिम हाती घेतली जाणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. दवाखान्यात दाखल उशिरा होण्यामुळे अनेकांच्या प्राणांवर बेतले असून, लवकर दवाखान्यात उपचारार्थ दाखल व्हावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.