esakal | इंदापुरातील नर्सला कोरोना, इंजेक्शन टोचलेल्यांची होणार तपासणी 
sakal

बोलून बातमी शोधा

corona1

इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कोरानाची लागण झालेल्या नर्सच्या संपर्कात आलेल्या १५ कर्मचाऱ्यांची कोरोनाची तपासणी करण्यात येणार असून, उर्वरित नागरिकांचा शोध सुरु आहे.

इंदापुरातील नर्सला कोरोना, इंजेक्शन टोचलेल्यांची होणार तपासणी 

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे)  : इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कोरानाची लागण झालेल्या नर्सच्या संपर्कात आलेल्या १५ कर्मचाऱ्यांची कोरोनाची तपासणी करण्यात येणार असून, उर्वरित नागरिकांचा शोध सुरु आहे.

या सोळा जणांच्या कोरोनाच्या अहवालामुळे वेल्ह्यातील नागरिकांना... 

बारामतीमध्ये राहणाऱ्या व लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित नर्स रुग्णांना इंजेक्शन देण्याचे काम करीत होती. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आलेले किती रुग्ण तिच्या संपर्कामध्ये आले आहेत, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुमारे १५ कर्मचाऱ्यांच्या घशातील नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती लासुर्णे  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन सरतापे यांनी दिली.

 एका लग्नाची मोठी गोष्ट...वऱ्हाडींसह नवरा- नवरीचंही जुळलं कोरोनाशी नातं 

शेळगावमधील युवतीस कोरोनाची लागण...
शेळगावमधील २६ वर्षाच्या युवतीस कोरोनाची लागण झाली आहे. ही युवती मोरगाव व पुणे येथे गेल्याची माहिती मिळाली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तिच्या संपर्कामध्ये घरातील पाच नागरिक आले असून, त्यांचीही तपासणी होणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेखा पोळ यांनी सांगितले.

Edited by : Nilesh Shende