CoronaVirus : राज्यातील निरीक्षणाखालील 121 जणांना संसर्ग नाही

CoronaVirus 121 negative cases found in Pune
CoronaVirus 121 negative cases found in Pune

पुणे : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारपर्यंत 515 विमानांमधून उतरलेल्या 61 हजार 939 प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी सर्दी, ताप, खोकला अशी कोरोना विषाणूंच्या संसर्गाची लक्षणे असणाऱ्या 125 जणांना राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यापैकी 121 जणांना विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याचा निर्वाळा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) दिला. उर्वरित चार जणांचे प्रयोगशाळा अहवाल पुढील चोवीस तासांमध्ये मिळतील, अशी माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार चीन, हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या दहा देशातील प्रवाशांसोबतच आता इराण आणि इटली या देशातील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्‍यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 370 प्रवासी आले आहेत.

बाळासाहेबांनी भाजपला पाठींबा दिला होता, पण... : शरद पवार

ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने 18 जानेवारीपासून 125 जणांना विलगिकरण कक्षेत दाखल केले होते. त्यातील 121 जणांना संसर्ग झाला नसल्याचे कळविण्यात आले आहे. सध्या पाच जण मुंबईत तर प्रत्येकी पुणे आणि नाशिक येथे प्रत्येक एक जण दाखल आहे. नाशिक येथे भरती असलेला प्रवासी करोनासाठी "निगेटिव्ह' आढळला आहे, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

प्रवाशांचा पाठपुरावा चौदा दिवस
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान शहरातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा 14 दिवसांकरिता करण्यात येतो आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 370 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, बुलडाणा, नागपूर, वर्धा, सांगली, नगर, अमरावती, नाशिक, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातूनही चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com