दौंड शहर व परिसरात वाढतोय कोरोनाचा विळखा

प्रफुल्ल भंडारी
गुरुवार, 9 जुलै 2020

शहरात कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या वडार गल्ली येथील दोन, पंडित नेहरू चौक, भोईटेनगर व पानसरे वस्ती येथे प्रत्येकी एक, अशा पाच जणांना बाधा झाली आहे. तर दौंड - कुरकुंभ रस्त्यालगत गोपाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत बोरावकेनगर येथे एक आणि लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील वेताळनगर व बिलावल नगर येथे दोन जणांना बाधा झाली आहे. आठ बाधितांमध्ये चार महिलांचा समावेश असून या बाधितांचे वय २५ ते ५० दरम्यान आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 

दौंड (पुणे) - दौंड शहर व परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून आज तब्बल आठ जणांना बाधा झाली आहे. दौंड नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक आणि सहा आरोग्य कर्मचारी यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या वडार गल्ली येथील दोन, पंडित नेहरू चौक, भोईटेनगर व पानसरे वस्ती येथे प्रत्येकी एक, अशा पाच जणांना बाधा झाली आहे. तर दौंड - कुरकुंभ रस्त्यालगत गोपाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत बोरावकेनगर येथे एक आणि लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील वेताळनगर व बिलावल नगर येथे दोन जणांना बाधा झाली आहे. आठ बाधितांमध्ये चार महिलांचा समावेश असून या बाधितांचे वय २५ ते ५० दरम्यान आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 

मेगा भरती! पुणे जिल्हा परिषद दीड हजार रिक्त पदे भरणार!

दौंड नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील व सहा आरोग्य कर्मचारी, असे एकूण सात जणांची कोरोना चाचणी केली असता त्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नगरपालिका हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळल्यानंतर त्या भागाचे निर्जंतुकीकरण करणे, बाधिताच्या कुटुंबीयांची माहिती संकलित करणे, शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात वाहतूक रोखण्यासाठी अडथळे उभे करणे, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, आदी कामे आरोग्य पथकामार्फत केले जात आहेत. त्याशिवाय विना मास्क फिरणार्यांना दंड करणे, शारीरिक अंतराच्या आणि स्वच्छतेसंबंधी सूचना या पथकामार्फत दिल्या जात आहेत.  

बेरोजगार आहात? काळजी करू नका; ट्रेनिंगदरम्यान मिळणार दरमहा १० हजार अन् त्यानंतर नोकरीही!

दौंड शहरालगत लिंगाळी हद्दीतील सावरकरनगर येथे तीन दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील अनुक्रमे २५ व ५० वय असलेल्या दोन महिला आणि एक ५४ वर्षीय पुरूष, असे एकूण तिघांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे, अशी माहिती कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॅा. राजेश पाखरे यांनी दिली. 

६८ दिवसांत ८३ जणांना बाधा
दौंड शहरात १ मे ते ८ जुलै २०२० या कालावधीत तब्बल ८३ नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यापैकी २८ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर तीन महिलांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४८ बाधितांवर दौंड मधील दोन कोविड केअर सेंटर आणि पुण्यातील रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus is growing in daund city and Daund area