Coronavirus: ड्रायफ्रूट्‌सच्या आयात-निर्यातीवर सावट 

dryfruit
dryfruit

पुणे -  चीनसह अनेक देशात "कोरोना'चा प्रसार वाढला आहे. त्याचा परिणाम आता भारतीय बाजारपेठांत दिसू लागला आहे. एक महिन्यापासून चीन, इराणसह अन्य काही देशांतून मसाले आणि ड्रायफ्रूट्‌सची आयात आणि निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे बदाम, काजू आणि बेदाणा स्वस्त झाला आहे; तर आक्रोड आणि खजूरच्या दरात वाढ झाली. बाजारात या काळात ड्रायफ्रूट्‌सला मागणी मोठी असते; परंतु सध्या ही मागणी स्थिर आहे. 

भारतातूनही चारोळी, अक्रोड, बेदाणा, काजू मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जाते. दरवर्षी या काळात ड्रायफ्रूट्‌सला मोठी मागणी असते. त्यामुळे ड्रायफ्रूट्‌स आणि मसाल्याच्या पदार्थ तेजीत असतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे भाव कमी असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले. 

इराणवरून येणारी खजूर उत्पादनाची आयात थांबली आहे. त्यामुळे खजुराचे दर 40 ते 50 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत; तसेच भारतात यंदा अक्रोडचे उत्पन्न कमी झाले असून चिली आणि कॅलिफोर्निया या देशातूनदेखील अक्रोड आयात होते, ती आयातही सध्या बंद आहे; तसेच सदर ठिकाणीदेखील यंदा उत्पन्न कमी असहे. यामुळे अक्रोडच्या भावात 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे गोयल यांनी सांगितले. 

बदाम हा इराण आणि कॅलिफोर्निया येथून आयात केला जातो. बदामला चीनमधून मोठी मागणी असते. सध्या दोन्ही देशांतून चीनला निर्यात बंद आहे. बदामाच्या भावातही 20 ते 30 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. बदामाचा हंगाम हा जानेवारी ते मे महिन्यापर्यंत असतो; तसेच ऑस्ट्रेलियाचा बदामाचा हंगाम हा नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात असतो. त्यामुळे आयात निर्यातीची बदलती समीकरणे महागाईत भर घालणारी ठरत आहे. 

पुणे मार्केट यार्डातून ड्रायफ्रूट्‌स आणि मासाल्यांना पुणे शहर, उपनगरे, सातारा, कोल्हापूर, नगर, सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठी मागणी असते. सध्या कोरोनामुळे मागणीत मोठी घट झाली आहे. 
- नवीन गोयल, व्यापारी, मार्केट यार्ड. 

मसाल्यांच्या दरांना बसणार फटका 
चीनमधून भारतात मसाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. सध्या भारतात मसाल्यांचा साठा पुरेसा आहे; परंतु ही परिस्थिती कायम राहिल्यास त्याचा फटका मसाल्यांच्या दरांना बसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com