esakal | पुण्यात सरकारी कार्यालयं सुरू होणार? 'या' दिवशी होणार निर्णय!
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Commissioner Shekhar Gaikwad Said decision about opening government and private offices in the pune will declared on monday

विशेष म्हणजे, जुन्या 69 बाधित क्षेत्रांतील काही भाग पूर्णपणे वगळून तेथील दुकाने सुरू ठेवण्याच्या हालचाली महापालिका करीत आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा आहे. 

पुण्यात सरकारी कार्यालयं सुरू होणार? 'या' दिवशी होणार निर्णय!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील सरकारी, खासगी आस्थापनांसह काही भागात आणखी काही दुकाने उघडण्याचे नियोजन असून, त्यावर येत्या सोमवारपासून (ता.18) कार्यवाही होईल, असे संकेत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शनिवारी दिले. दुसरीकडे, कोरोनाचे रुग्ण नसलेला भाग बाधित क्षेत्रातून (कंटेन्मेंट झोन) वगळला जाईल आणि नव्याने रुग्ण सापडलेल्या काही परिसरांचा बाधित क्षेत्रात समावेश होण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तविली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशेष म्हणजे, जुन्या 69 बाधित क्षेत्रांतील काही भाग पूर्णपणे वगळून तेथील दुकाने सुरू ठेवण्याच्या हालचाली महापालिका करीत आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा आहे. 

पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू 

लॉकडाउनचा तिसरा टप्पा रविवारी (ता.17) संपणार असून, त्याआधीच काही भागांतील व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, तिसऱ्या टप्प्यांनर म्हणजे, येत्या सोमवारनंतर (ता.18) काय स्थिती असेल ? याची पुणेकरांत उत्सुकता आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध भागांतील रुग्ण संख्या, त्यांच्या वाढीचा कालावधी, कोरोनामुक्तांचे प्रमाण, त्याचा परिणाम स्पष्ट करीत पुढच्या काही दिवसांमधील नियोजनाबाबत गायकवाड यांनी आपली भूमिका मांडली. 

शिफ्ट संपली की जबाबदारी संपली; पुण्यात खाकी वर्दीच्या बेपर्वाईने 'त्या' रुग्णाचा मृत्यू

गायकवाड म्हणाले, "एकूण रुग्णांपैकी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर बाधित क्षेत्राबाहेर रोज सरासरी 18 ते 20 टक्के रुग्ण सापडत आहेत. त्या भागांतील बहुतांशी व्यवहार सुरू करूनही रुग्ण संख्या वाढत नसल्याने तेथे आणखी काही सवलती देता येतील. ज्यामध्ये सरकारी, खासगी कार्यालयांसह दुकानांचाही समावेश करता येणार आहे. ादृष्टीने संपूर्ण शहराचा आढावा घेत आहोत, ते काम पूर्णं करून सोमवारपासून (ता.18) नवे धोरण लागू करण्याच्या हालचाली आहेत. '' 

- हृदय पिळवटून टाकणारी कहाणी : '...ते माहीत नाही, पण आमचे मात्र कुटुंब उद्‌ध्वस्त झाले'

कोरोनाला रोखण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपायांचा फायदा होत असल्याने सूक्ष्म बाधित क्षेत्र करण्याचा प्रयत्न आहे. तेव्हाच, जिथे कुठे रुग्ण नाहीत मात्र, तो भाग सध्या बाधित क्षेत्रात आहे; तो आता वगळण्यात येणार आहे. त्याशिवाय, नवे रुग्ण सापडत असलेला काही भागाचा बाधित क्षेत्रात घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर बाधित क्षेत्रांसाठी कठोर उपाय आखून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे या परिसरांमधील रुग्ण कमी करता येतील, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

 लॉकडाउनंतर पालक लगेच मुलांना शाळेत पाठवणार का?

loading image