esakal | आली पुणेकरांसाठी गुड न्यूज आली; वाचा आनंदाची बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus infection rate decline dr deepak mhaisekar

ससून रुग्णालयामध्ये रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर, दुसरीकडे काही खासगी रुग्णालयांबाबत तक्रारी येत आहेत.

आली पुणेकरांसाठी गुड न्यूज आली; वाचा आनंदाची बातमी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे Cornavirus : कोरोना संशयितांच्या नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले असून, तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना संशयितांच्या नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. या तपासण्यांचे प्रमाण वाढले तरी त्या तुलनेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. नाशिक, नगर, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीचे प्रमाण सुमारे तीस टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे.

आणखी वाचा - पुण्यात या भागात भयाण शांतता!

ससून रुग्णालयामध्ये रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर, दुसरीकडे काही खासगी रुग्णालयांबाबत तक्रारी येत आहेत. चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या आणि जादा शुल्क वसूल केल्याप्रकरणी खासगी रुग्णालयास नोटीस देण्यात आली असून, व्यवस्थापनाला त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. पुणे कॅन्टोनमेंटमधील न्यू मोदीखाना परिसरात रुग्ण संख्या वाढत आहे. भवानी पेठ लगतचा हा परिसर आहे.

आणखी वाचा - पुण्यातील दोन उड्डाणपूल पाडणार हे निश्चित 

साडेबारा हजार मजूर रवाना
पुणे जिल्ह्यातून मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर, रेवा उत्तर प्रदेशातील अलाहाबाद प्रयागराज, राजस्थान येथील जोधपूर यासह अन्य राज्यांमध्ये 12 हजार 421 मजूर आपल्या घरी परतले आहेत. बिहार राज्यातील मजुरांनाही पाठविण्यात येणार आहे. येत्या तीन-चार दिवसांत आणखी काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती राम यांनी दिली.