संतापजनक : कंटेन्मेट झोनमध्ये बोगस डॉक्टरांकडून तपासणी; नागरिकांच्या जीवाशी खेळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

येरवड्यातील कंटेन्मेट परिसरात डॉक्टरांना थेट नागरिकांपर्यंत घेऊन जाणाऱ्या एका उपक्रमात सुरू असलेल्या रुग्णवाहिकेसोबत चक्क डॉक्टरेट ( वाणिज्य शाखेतील PhD) व्यक्ती रुग्णांची तपासणी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित व्यक्तीने येरवड्यासह ताडीवाला रस्ता येथे चार आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी करून गोळ्या औषधे दिल्याची माहिती मिळते. या संदर्भात अद्याप कोणतिही तक्रार दाखल झालेली नाही. पण, तेथील आरोग्य तपासणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

येरवडा (पुणे Pune News) - येरवड्यातील कंटेन्मेट परिसरात डॉक्टरांना थेट नागरिकांपर्यंत घेऊन जाणाऱ्या एका उपक्रमात सुरू असलेल्या रुग्णवाहिकेसोबत चक्क डॉक्टरेट ( वाणिज्य शाखेतील PhD) व्यक्ती रुग्णांची तपासणी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित व्यक्तीने येरवड्यासह ताडीवाला रस्ता येथे चार आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी करून गोळ्या औषधे दिल्याची माहिती मिळते. या संदर्भात अद्याप कोणतिही तक्रार दाखल झालेली नाही. पण, तेथील आरोग्य तपासणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओमध्येही आरोग्य तपासणी करणारी व्यक्ती पीपीई किटमध्ये असल्यामुळं ती व्यक्ती कोण आहे? खरचं ती व्यक्ती डॉक्टर आहे का? याची माहिती मिळत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरापलिकेच्या परिसरात ७५ रुग्णावाहिकांमधून डॉक्टरांना थेट नागरिकांपर्यंत घेऊन जाणारा हा उपक्रम राबविला जात आहे. मात्र, या उपक्रमात वाणिज्य शाखेतील डॉक्टरेट असलेल्या प्राध्यापिका व हौसी समाजसेविकेने डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात चक्क रुग्णांची तपासणी करून गोळ्या औषधे दिल्याचे उघड झाले आहे. येरवड्यातील मदर तेरेसानगर येथे एका ठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात त्यांनी रुग्णांची तपासणी करून गोळ्या औषधे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

'आत्मनिर्भर भारत घडवायचा असेल तर...'; काय म्हणाले नितीन गडकरी पाहा!

गेल्या महिन्यात या उपक्रमात प्राध्यपिकेने पीपीई किट परिधान करून येरवड्यात डॉक्टरांसोबत रुग्णांना गोळ्या औषधे देण्याचे कार्य केले होते. त्यानंतर रुग्णांना सर्दी, ताप, खोकला आहे का, विचारून त्या संबंधित औषधे देण्याचे काम अगदी सोपे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. डॉक्टर काही वेळ रुग्णांची तपासणी करून गेल्यानंतर या स्वत: रुग्णांची चौकशी करून त्यांना गोळ्या औषधे देत. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वाास वाढल्याने व कोणीच हरकत घेत नसल्याने त्या स्वत: रुग्णांना गोळ्या औषधे देऊ लागल्या. संबंधित व्यक्ती एका महाविद्यालयातील प्राध्यापिका आहे. समाजसेवा क्षेत्रात त्यांचे नाव आहे. मात्र, कंटेन्मेट झोनमध्ये मधुमेह, रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीला गोळ्या औषधे चुकून दिल्यास त्याची रिॲक्शन होण्याची शक्यता असते. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना रुग्णांना हाताळणे धोक्याचे असल्याचे मत सर्वसामान्य व्यक्तीही सांगू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lock down containment zone fake doctor