इथंही शरद पवारच ठरले किंगमेकर!

टीम ई-सकाळ
रविवार, 10 मे 2020

राज्यांतील मजुरांची महाराष्ट्रात अडकले होते. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमधील स्थलांतरीतांची संख्या जास्त होती.

une-news" target="_blank">पुणे Coronavirus : राज्यात अडकलेल्या लाखो मजूर, कामगारांना आपआपल्या गावाकडे परतण्यासाठी रेल्वेच्या गाड्या सुरू झाल्या आहेत. तसेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक या राज्यांनीही आता सकारात्मक भूमिका घेतली आहे. हे सगळे साध्य करण्यात पडद्याआड राहून महत्त्वाची भूमिका बजावली ते राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी.

आणखी वाचा - या कारणामुळं शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींनी मिळाली संधी

पवारांचे व्यक्तिगत संबंध
राज्यात बांधकाम, हॉटेल, उद्योग, व्यवसायासाठी परराज्यातील सुमारे 22 लाख मजूर, कामगार आहेत. कोरोनामुळे 25 मार्चपासून देशात लॉकडाउन लागू झाला. त्यामुळे विविध राज्यांतील मजुरांची महाराष्ट्रात अडकले होते. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमधील स्थलांतरीतांची संख्या जास्त होती. मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे गाड्या सुरू करण्याची परवानगी दिली तरी, त्याबाबतचे सोपस्कार संबंधित राज्यांनी पूर्ण करावेत, असे सांगितले होते. इथंच खर नाट्य सुरू झाले आणि शरद पवार यांनी वैयक्तिक पातळीवर नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बॅनर्जी, नितीश कुमारांशी संपर्क
काही राज्यांनी सुरवातीला त्यांच्या मजुरांना स्वीकारण्यासही नकार दिला होता. त्यांना स्वीकारायचे असेल तर त्यांनी अवघड अटी घातल्या. त्यातच काही राजकीय कारणेही पुढे येऊ लागली. त्यामुळे डेडलॉक होऊ लागला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही काही मंत्र्यांनी विचारविनिमय करण्यासाठी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पवार यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, बिहारमध्ये नितीशकुमार, त्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासह कर्नाटकशीही संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चेच्या दोन-तीन फेऱया झाल्या. त्यानंतर प्रशासकीय पातळीवरही चर्चा होत गेली अन निर्माण झालेला प्रश्न सुटला.

आणखी वाचा - पुण्यासाठी ही बातमी महत्त्वाची; वाचा सविस्तर 
 
पियुष गोयल यांचा प्रतिसाद
दोन राज्यांमधील प्रश्न सुटला तरी, रेल्वेकडून गाड्या उपलब्ध होणे गरेजेच होते. त्यासाठी शरद पवार यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी संपर्क साधला. पवार आणि त्यांचे जवळचे संबंध आहेत. ते या वेळी कामाला आले. गोयल यांनी लक्ष घातल्यामुळे रेल्वे प्रशासन वेगाने हालले. त्याचवेळी पवार यांनी राज्य सरकारला  सूचना देऊन कामगारांच्या याद्या तयार करण्याची यंत्रणा बारकाईने हलविली. याचवेळी रेल्वे प्रवासाच्या तिकिटाच्या शुल्काचाही प्रश्न सोडविण्यात पवार यांना यश आले. त्यामुळे भराभर याद्या तयार झाला. एका यादीत किमान 1200 मजूर असले पाहिजे, या अटीचे पालन होऊन नाशिक, मुंबई, पुणे आदी विविध शहरांतून श्रमिक स्पेशल धावू लागली अन कामगार आपआपल्या गावी पोचू लागले. त्यांची वैद्यकीय तपासणी वेळेत होईल, या पासून विविध प्रकारची काळजी घेण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या होत्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कार्यक्षमतेचा पुन्हा परिचय
चार पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तातडीने चर्चा करून प्रशासकीय यंत्रणा हलविणे, रेल्वे मंत्रालयाशी संवाद साधून गाड्या सोडून लाखो कामगारांचा प्रश्न सोडविताना पवार यांनी त्यांच्या राजकीय कौशल्याबरोबरच प्रशासकीय कार्यक्षमताही पुन्हा एकदा अवघ्या राज्यालाच नव्हे तर देशाला दाखवून दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown maharashtra sharad pawar initiative shramik train