esakal | म्हणून राष्ट्रवादीने अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदेंना दिली संधी!
sakal

बोलून बातमी शोधा

nationalist congress party mlc candidate selection amol mitkari shashikant Shinde

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव करण्यात शशिकांत शिंदे यांचा मोठा वाटा होता. मात्र, त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

म्हणून राष्ट्रवादीने अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदेंना दिली संधी!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : विधानपरिषदेच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत महत्वाच्या आणि विश्वासू अशा दोन चेहऱ्यांना संधी दिली आहे. अकोल्याचे अमोल मिटकरी आणि साताऱ्याचे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने त्यांना दिलेला शब्द पाळला आहे. एकाबाजूला भाजपमध्ये उमेदवार निवडीनंतर प्रचंड नाराजी आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली उमेदवारांची निवड योग्यच असल्याचा सूर आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शशिकांत शिंदे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आहेत. निवडणुकीच्या वेळी लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव करून राष्ट्रवादीनं गड राखला. पण, कोरेगाव कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचे महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा केवळ सहा हजार 299 मतांनी पराभव केला. त्यामुळं गड आला पण, सिंह गेला, अशी राष्ट्रवादीची अवस्था होती. म्हणूनच शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.

आणखी वाचा - पुणे पोलिस लई हुशार!

शशिकांत शिंदे, अमोल मिटकरीच का?
शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू आहेत. शिंदे हे एक मराठा नेते असून, सातारा जिल्ह्यात त्यांची वेगळी ओळख आहे. कोरेगाव मतदारसंघातून ते दोनवेळा आमदार राहिलेले आहेत. मुंबई आणि नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव करण्यात शशिकांत शिंदे यांचा मोठा वाटा होता. मात्र, त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. अमोल मिटकरी यांनी विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थानं गाजवली. दोन अमोल चर्चेत होते. मिटकरी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे. मिटकरी यांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत होते. भाजपवर मुद्देसूद आणि कठोर शब्दांत टीका करण्याचं काम मिटकरी यांनी पार पाडलं होतं.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोण आहेत अमोल मिटकरी?
अकोला जिल्ह्यातील अमरावती जिल्हा सीमेलगत असलेले खारपाणपट्ट्याचे गाव कुटासा. राज्यभरात आपल्या वक्तृत्वशैलीची छाप पाडणाऱ्या अमोल मिटकरी यांचे हे गाव. त्यांच्या परिवारावर कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. जेमतेम दोन एकर शेती सांभाळून किराणा दुकान चालविणाऱ्या त्यांच्या वडीलांनी समाजसेवेची ज्योत त्यांच्यात जागती ठेवली असल्याने प्रबोधनासह पुरोगामी विचारांच्या प्रचार प्रसाराचे काम ते मोठ्या जोमाने करीत आहेत. विचार व्यक्त करण्याची शक्ती निसर्गाने सर्वांनाच दिलेली आहे. मात्र, त्याचा प्रभावी वापर करून कुटासासारख्या छोट्याशा गावातून थेट देशपातळीवरील आघाडीचा वक्ता होण्याची ख्याती अमोल मिटकरी यांनी प्राप्त केली आहे. 

आणखी वाचा - प्रत्येकाच्या डीपीवर झळकतायत महाराष्ट्र पोलिस; काय आहे कारण?

राष्ट्रसंतांच्या भजनांची आवड आणि विचारांचा प्रभाव असणाऱ्या अमोल मिटकरी यांनी लहानपणापासून गुरुदेव भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार गावागावात पोहचविण्याचे काम केले. आपल्या वक्तृत्व कलेची साधना आणि उपासनेतून त्यांनी श्रोत्यांवर लहानपणापासूनच प्रभाव पाडला. त्यांनी राज्यघटनेचा सखोल अभ्यास केला. राज्यघटनेतील बारकावे अभ्यासताना महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही त्यांनी जाणून घेतले. गणेशोत्सव, दुर्गोत्सव किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो आपले विचार मांडण्याची त्यांना प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे सातत्याने संधी मिळत गेली. सर्वप्रश्नांची उत्तरे राज्यघटनेत असल्याचे ठाम मत ते आपल्या सभांमधून वारंवार व्यक्त करतात.

loading image