esakal | कोथरूडकर म्हणताहेत, रेडझोनमधील रहिवाशांना कोथरूडमध्ये आणाल तर....
sakal

बोलून बातमी शोधा

kothrudd1.jpg

रेडझोनमधील रहिवाशांना येथील शाळा व शासकीय इमारतीमध्ये आणणार असाल तर आम्ही त्याला कडाडून विरोध करू अशी भावना कोथरूडमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. 

कोथरूडकर म्हणताहेत, रेडझोनमधील रहिवाशांना कोथरूडमध्ये आणाल तर....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोथरूड (पुणे) : ग्रीनझोन कायम राखण्यासाठी कोथरुडकरांनी खूप संयम व निर्बंध पाळले आहेत. आता रेडझोनमधील रहिवाशांना येथील शाळा व शासकीय इमारतीमध्ये आणणार असाल तर आम्ही त्याला कडाडून विरोध करू अशी भावना कोथरूडमधील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. 

पुण्याची जिद्दी कन्या, बाळंतपणातून उठून लढतेय आेडिशात कोरोनाची लढाई...

पेठांमध्ये असलेल्या झोपडपट्ट्या व त्यातील दाट लोकवस्ती यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवणे अवघड जात आहे. यावर पर्याय म्हणून येथील लोक इतर भागात हलविण्याचा विचार प्रशासन करत असल्याची चर्चा लोकांमध्ये पसरल्याने समस्त कोथरुडकरांनी अशा कोणत्याही निर्णयाला आमचा विरोध असेल असे ठणकावले आहे. 

आप वापस आयेंगे क्‍या ? पुण्याहून एमपीला निघालेले मजूर म्हणाले...

दरम्यान पाच पर्यंत गेलेली कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आलेली असतानाच पुन्हा एक कोरोना रुग्ण कोथरूडमध्ये आढळला आहे. दवाखान्यात दाखल असलेल्या कुटुंबातील व्यक्तीच्या देखभालीसाठी जाणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. शून्यावर आलेली संख्या परत वाढू लागल्याने कोथरुडकरांचा संयम सुटत चालला आहे. 

पुण्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय; गेल्या तीन दिवसांत...

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले म्हणाले, "महापालिका अधिकारी, पोलिस, आरोग्य विभाग यांच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत लोकांनी लॉकडाऊनचे पालन केले आहे. बाहेरील लोकांना येथे आणण्यापेक्षा त्या त्या विभागातील मैदाने, शाळा, महाविद्यालयाच्या इमारती तात्पुरत्या ताब्यात घेऊन स्थानिक रहिवाशांची सोय करावी. कोथरूडचे वातावरण बिघडवू नये. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सामाजिक कार्यकर्ते दिलीप कानडे म्हणाले, केळेवाडी, जयभवानीनगर येथील महापालिका शाळेच्या इमारतीमध्ये बाहेरील लोक रहायला आणणार असल्याची अफवा नागरिकांमध्ये पसरली आहे. त्याला स्थानिक रहिवासी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा विरोध आहे.प्रतिबंधित भागातील लोक येथे दारू विकत घेण्यासाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विनापास पोलिस ठाण्याची हद्द ओलांडणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. 

कोथरूड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी म्हणाल्या, "कोथरुडकरांनी केलेल्या सहकार्यामुळे हा भाग ग्रीनझोन मध्ये राहिला आहे. यापुढेही अशी कोणतीही चूक होऊ नये अशी अपेक्षा आहे. बाहेरचे लोक येथे दारू विकत घ्यायला येत असतील तर हे गंभीर आहे. अशा गोष्टी निदर्शनास आल्यास कारवाई होईल.'  

loading image
go to top