Breaking News : पुण्यासाठी लॉकाडाउनचे वेगळे नियम; आयटी कंपन्या सुरू होणार!

Pune-Lockdown
Pune-Lockdown
Updated on

पुणे - पुण्यातील बाधित क्षेत्रांसाठी जीवनावश्य क वस्तुंच्या दुकानांसह या क्षेत्राबाह्रेरील बहुतांशी व्यवहार बुधवारपासून (ता. 20) सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, सर्व प्रकारची सावर्जनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे "पीएमपी', कॅब, रिक्षांसह मॉल, मल्टीप्लेक्स्, हॉटेल, सलून बंद राहणार आहेत. बाधित क्षेत्र वगळता अन्य भागांतील बॅंका, सरकारी कार्यालये, आयटी कंपन्या, बांधकाम सुरू होतील. विशेष म्हणजे, काही रसते वगळता बहुतांशी परिसरात पथारी व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली आहे. मॉलमधील जीवनाश्य.क वस्तुंची दुकाने उघडता येतील. परंतु, दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंतच उघडी ठेवता येणार आहे. दरम्यान, बाधित क्षेत्रात अत्यावश्य क सेवा वगळता अन्य घटकांना विशेषत: नागरिकांना रस्त्यांवर येण्यास बंदी आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ज्या भागांतील सोसायट्या, व्यापारी संकुला कोरोनाचे रुग्ण आढळून येतील आणि ते प्रमाण वाढत गेल्या त्या जागा सील करून त्यांचा समावेश बाधित क्षेत्रात केला जाणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्याशिवाय, दुकाने सुरू करताना संबंधित मालकांना आपल्याकडच्या कामगारांसह ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपविली. त्याकडे काणाडोळा करणाऱ्या व्यावसायिकांना कारवाईला तोंड द्यावे लागणार असल्याचेही बजाविण्यात आले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वंभूमीवर चौथ्या टप्प्यातील म्हणजे येत्या 31 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार बाधित क्षेत्र वगळता बहुतांशी परिसरातील व्यवहार सुरू करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी रात्री दिले आणि नव्या आदेश लगेचच म्हणजे रात्री बारानंतर अमलात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.

त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या बाजारपेठा पुन्हा सुरू होणार आहेत. तसेच, पथारी व्यावसायालाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, हडपसर-(सोलापूर रस्ता),पुणे-सातारा रस्ता, नगर रस्ता, सिंहगड रस्ता, वाघोली, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, गणेशखिंड रस्ता पथारी व्यावसायिकांना परवानगी नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नव्याने काही सवलती देताना जुन्या 69 बाधित क्षेत्रातील 24 भाग वगळण्यात आले आहेत. तर नवा भाग समाविष्ठ करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com