Coronavirus : पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनाही 'सुरक्षा कवच' पाहिजे

Coronavirus Pune PMP employees need security
Coronavirus Pune PMP employees need security

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनासाठी केलेल्या 'सुरक्षा कवच'  या योजनेमध्ये पीएमपीच्या अत्यावश्यक सेवेतील सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांनी सहभागी करून घ्यावे अशी मागणी प्रशासनाने एका पत्राद्वारे गुरुवारी केली. तसेच या योजनेतून पीएमपीला वगळ्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा सामना करताना महापालिकेच्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांचा निधी आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही अशाच आशयाचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दोन्ही महापालिकांनी पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश केलेला नाही. अत्यावश्यक सेवेअंतर्गत सध्या पीएमपीच्या 120 बसेस सुरू आहेत. या बसची वाहतूक सुरू राहावी, यासाठी पीएमपी'चे कंडक्टर, ड्रायव्हर, मॅकेनिक, फिटर, तिकीट तपासनीस आदी सुमारे एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनाही दोन्ही महापालिकांनी सुरक्षाकवच योजनेमध्ये सहभागी करुन घ्यावे, अशी मागणी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी गुरुवारी एका पत्राद्वारे केली आहे. दरम्यान पुणे महापालिकेच्या विविध रुग्णालयातील 128 परिचारिकांना शुक्रवारपासून पीएमपीच्या बस सेवेमध्ये मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने पीएमपीचे 25 ड्रायव्हर सध्या त्यांच्या वाहनांसाठी घेतले आहेत.  

सचिवांकडून २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी; गृहमंत्र्यांकडून कारवाई

पुष्पक अहोरात्र उपलब्ध
पीएमपीची 'पुष्पक' शववाहिनी आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अहोरात्र उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी नागरिकांनी 24 50 3211 किंवा 12 वर संपर्क साधावा, असे आवाहन पीएमपी'चे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com