गुड न्यूज : राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेत विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

पुण्यात एमपीएससीच्या तयारी करीत असलेले अनेक विद्यार्थी आहेत.त्यांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या पाहिजेत.

पुणे : राजस्थानमधील कोटा येथील अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्वगृही परतण्याची व्यवस्था करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केली. त्यास राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग खुला होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तांबे यांना पत्र पाठवून महाराष्ट्र सरकारसोबत या विषयावर चर्चा होत असून, लवकरच निर्णय निघेल, अशी आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले. तांबे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राजस्थान सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत पुढील प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. तांबे म्हणाले, "कोटा येथे मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेले जवळपास दोन हजार विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडचणीत अडकले असून, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या मागणीची दखल घेतली आहे. दोन्ही राज्य सरकारे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत चआणण्यासाठी हालचाली करत आहेत, अशी माहिती त्यांना दिली."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सत्यजित तांबे म्हणाले, "पुण्यात एमपीएससीच्या तयारी करीत असलेले अनेक विद्यार्थी आहेत. तेही अडकले आहे. त्यांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या पाहिजेत."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus rajasthan government will send maharashtra students from kota