तुम्हाला राज्याबाहेर प्रवास करायचाय? ई-पाससाठी वाचा ही बातमी

coronavirus traveling from Maharashtra other states
coronavirus traveling from Maharashtra other states

पुणे Coronavirus  : तब्बल सात आठवड्यांच्या लॉकडाउननंतर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेले विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांना घरी परतण्यासाठी सशर्त प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी संबंधित राज्याच्या पोलिस यंत्रणेने जारी केलेला फॉर्म संबंधितांनी भरून देणे गरजेचे आहे. नक्की काय आहे ही प्रक्रिया, कसा करणार प्रवास जाणून घेऊयात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रात परतण्यासाठी काय कराल?
शिक्षणासाठी किंवा वेगवेगळ्या कारणाने दुसऱ्या राज्यात राहणाऱ्या नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. अशांनी घरी परतण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर आवश्यीक ती माहिती भरावी. जर तुमच्याकडे स्वतःचे वाहन असेल तर, उत्तमच नाहीतर प्रशासन व्यवस्था करेपर्यंत थांबावे. शक्य  असल्यास घरून वाहन बोलवा शकता. त्यासाठी तुमच्या घरच्यांना किंवा संबंधितांना महाराष्ट्रातील पोलिसांची परवानगी तर, घ्यावीच लागेल पण त्याचबरोबर संबंधित राज्यातील पोलिसांचीही ऑनलाइन परवानगी घ्यावी लागेल. ऑनलाइन फॉर्म भरल्यावर तुम्हाला टोकन क्रमांक मिळेल. त्याद्वारे तुमची परवानगीची प्रक्रिया कुठवर आली यावर लक्ष ठेवू शकतात. अधिकचे प्रयत्न म्हणून आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी किंवा तहसीलदारांशी सोशल मिडीयाद्वारे संपर्क ठेवू शकतात. प्रवास करण्यासाठी तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कसे काढणार वैद्यकीय प्रमाणपत्र? 
तुम्ही राहत असलेल्या परिसरात सरकारी हॉस्पिटल असल्यास उत्तमच नाहीतर खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करुण वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवावे. संबंधी प्रमाणपत्रासाठी कोविडची चाचणी केलीच पाहिजे असे नाही. नेहमी सारखे तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र मिळवा. ग्रुपने जाणार असाल तर फक्त एकाचेच प्रमाणपत्र ऑनलाइन अनलोड करा. त्यामध्ये सोबत असणाऱ्यांची संख्याही लिहा. पोलिसांनी मागितल्यास सर्वांचे प्रमाणपत्र आवश्यहक आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्राबाहेर कसा प्रवास कराल?
राज्याबाहेर जाण्यासाठी संबंधित राज्यातील आणि आपल्या राज्यातील पोलिसांची परवानगी ऑनलाइन पद्धतीने काढावी लागेल. दोनही राज्यातील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रवास करणे शक्यन होईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इतर राज्यातील ई-पास साठीची संकेतस्थळ
(काही राज्यांच्या वतीने ऍप विकसित करण्यात आली आहेत.) 
1) उत्तर प्रदेश - http://164.100.68.164/upepass2/ 
2) दिल्ली - https://epass.jantasamvad.org/epass/relief/english/ 
3) छत्तीसगड - https://play.google.com/store/apps/details?id=com.allsoft.corona 
4) गुरुग्राम - https://onemapggm.gmda.gov.in/movementpassggm/admin/Register 
5) चंदीगढ - http://admser.chd.nic.in/dpc/Default.aspx 
6) हिमाचल प्रदेश - http://covidepass.hp.gov.in/apply-for-e-pass/ 
7) बंगळूर - https://kspclearpass.mygate.com/signup 
8) केरळ - https://pass.bsafe.kerala.gov.in/ 
9) हरियाना - https://covidssharyana.in/ 
10) देहरादून - http://dsclservices.in/search.php 
11) मध्य प्रदेश - https://mapit.gov.in/covid-19/ 
12) ओडिसा - http://epass.ocac.in/ 
13) आसाम - http://103.8.249.88/applyonline/index.php/gatepasscontrol/applycaronline 
14) कर्नाटक - https://play.google.com/store/apps/details?id=com.mygate.express&hl=en 
15) कोलकता - https://coronapass.kolkatapolice.org/ 
16) उत्तराखंड - https://policecitizenportal.uk.gov.in/e_pass/Home/Index 
17) बिहार - http://biharpolice.bih.nic.in/ 
18) तमिळनाडू - https://serviceonline.gov.in/tamilnadu/citizenRegistration.html?OWASP_CSRFTOKEN=7C0K-5T9X-5PYJ-4O21-BZS4-NDOP-TP94-5L2D 
19) राजस्थान - https://play.google.com/store/apps/details?id=com.datainfosys.rajasthanpolice.publicapp 
20) तेलंगण - अत्यावश्य?क कामासाठी पासची आवश्यpकता नाही. 
21) गोवा - https://goaonline.gov.in/Public/UserRegistration_af 
22) आंध्रप्रदेश - https://gramawardsachivalayam.ap.gov.in/CVPASSAPP/CV/CVOrganizationRegistration 
23) पंजाब - https://epasscovid19.pais.net.in/ 
24) झारखंड - https://play.google.com/store/apps/details?id=com.pragyaam.grid.mobile&hl=en_IN

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com