Coronavirus : ब्रिटनहून पुण्यात आलेल्या 109 जणांचा शोध लागेना

Coronavirus : ब्रिटनहून पुण्यात आलेल्या 109 जणांचा शोध लागेना
Updated on

पुणे - ब्रिटनहून पुण्यात आलेल्या 109 प्रवाशांचा शोध लागत नाही. त्यामुळे या प्रवाशांची माहिती घेण्यास पोलिसांची मदत पुणे महापालिकेने मागितली आहे. त्या बाबतचे पत्र पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. अश्विन भारती यांनी पोलिसांना दिले आहे. 

ब्रिटनहून आलेल्या 542 प्रवाशांची यादी राज्य सरकारने पुण्याला दिली होती. त्यात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांचा समावेश आहे. त्यापैकी 109 प्रवाशांपर्यंत पोचता आले नाही. त्यामुळे यापैकी ते नेमके कोणत्या भागातील आहे, याची माहिती मिळाली नाही. यादातील 542 पैकी तीनशे प्रवाशी एकट्या पुण्यातील होते. त्यांच्याशी संपर्क साधण्यात महापालिकेला यश आले आहे. दरम्यान, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोरेळे आणि विशेष शाखेचे पोलिस आयुक्त मितेश घट्टे यांनी महापालिकेचे पत्र अद्याप मिळाले नसल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान, आज राज्य सरकारकडून 988 प्रवाशांच्या दुसरी यादी महापालिकेत आली. त्यात 626 प्रवाशी पुणे महापालिकेच्या हद्दीत राहणार आहेत. 

राज्य सरकारने दिलेल्या यादीत प्रवाशाचे नाव, वय, त्यांचा पासपोर्ट नंबर, विमानाचा नंबर अशी व्यवस्थित माहिती दिलेली आहे. तो प्रवासी विमानतळावर कधी उतरला त्याचीही माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात यश आले. मात्र, काही प्रवाशांचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर नाही, काहींचा परदेशातील मोबाईल नंबर आहे. अशा 109 प्रवाशांची यादी पोलिसांना दिली आहे. 
-डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com