न्यूमोनियावर आली पहिली स्वदेशी लस; सिरमच्या 'न्यूमोसिल'चे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

स्वदेशी लस असून तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. आजवर आपण परदेशातून या लशी आयात करत होतो. पर्यायाने लसीकरणावर त्याचा परिणाम होत होता.

पुणे : लहान मुलांसाठी लागणारी देशातील पहिली स्वदेशी "निमोनिया'वरील लस आता तयार झाली आहे. पुण्यातील सिरम इंस्टिट्यूटने विकसित केलेल्या 'न्यूमोसिल' लसीचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते सोमवारी (ता.28) वेबिनारच्या माध्यमातून अनावरण करण्यात आले. यावेळी सिरमचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला, कार्यकारी संचालक डॉ.राजीव ढेरे, आरोग्य मंत्रालयाचे डॉ. मनोहर अगनानी आदी उपस्थित होते. 

निमोनियावरील लसीची आवश्‍यकता
देशभरात दरवर्षी 67 हजारांपेक्षा जास्त पाच वर्षाखालील मुलांचा निमोनियामुळे मृत्यू होतो. बालमृत्यूमध्ये सुमारे 71 टक्के मृत्यू हे निमोनियाचे आहेत. त्यामुळे लहान मुलांचा जीव वाचविण्यासाठी निमोनियावरील लसीची आवश्‍यकता आहे. 

'आम्हाला 2 कोटी कोरोना डोस द्या, अन्यथा...'; आशियातील देशाने...

सिरमच्या लसीने काय फायदा होईल? 
स्वदेशी लस असून तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. आजवर आपण परदेशातून या लशी आयात करत होतो. पर्यायाने लसीकरणावर त्याचा परिणाम होत होता. आता सरकारला लहान मुलांच्या लसिकरणात याचाही समावेश करता येईल आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे शक्‍य होणार आहे. 

न्यूमोसिल्सची वैशिष्ट्ये :
- जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेली ही लस पाच वर्षाखालील मुलांसाठी आहे 
- आफ्रिका, गांबीयामध्ये पाच वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. कोणतेही साइड इफेक्‍ट नसलेली ही लस सुरक्षित आहे 
- बील आणि मिलिंडा गेट्‌स फाउंडेशन, पीएटीएच या संस्थांच्या सहकार्याने मागील दशकापासून या लसीवर संशोधन चालू होते. 
- कॉंज्यूगेट (संयुग) प्रकारातील लस 
- एकूण तीन डोस द्यावे लागतील, दोन डोस महिन्याच्या अंतराने आणि शेवटचा डोस सहा महिन्यानंतर 

2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी?

जगाच्या तोडीने भारतातही तेवढ्याच दर्जाची सुरक्षित आणि स्वस्त लस विकसित करण्याची क्षमता असल्याचे या घटनेतून सिद्ध झाले आहे. निमोनियासंबंधीत लसीकरणासाठी ही लस मैलाचा दगड ठरणार असून, हे सिरमचे नाही तर संपूर्ण देशाचे यश आहे. 
- डॉ. हर्ष वर्धन, केंद्रीय आरोग्य मंत्री 

जगभरातील कुटुंबांसाठी सुरक्षित आणि परवडेल अशा दरात लसी उपलब्ध व्हाव्यात असा आमचा कायम प्रयत्न राहिला आहे. लहान मुलांना निमोनियापासून बचावासाठी ही लस विकसित करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने बालमृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यासाठी ही लस प्रभावी ठरेल. 
- आदर पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिरम इंस्टिट्यूट, पुणे

CBSE बोर्डच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षांच्या तारखा गुरुवारी होणार जाहीर!​

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First indigenous vaccine against pneumonia developed by Serum Institute