सावधान! बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी राज्यभर सक्रिय

A gang that forged documents for bail is active across the state
A gang that forged documents for bail is active across the state

पुणे : चोरी, घरफोडी, दरोडा, पोक्‍सो यासारख्या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींना जामिनावर सोडविण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयाची फसवणूक करणारी टोळी राज्यभर सक्रिय आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासात ही माहिती पुढे आली आहे.

या गुन्ह्यात आत्तापर्यंत शिवाजीनगर पोलिसांनी 19 जणांना अटक केली आहे. तर दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायालयात सुरू असलेल्या या रॅकेटची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपास केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. एजंटांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक स्थापन करून 37 जणांना ताब्यात घेतले होते. कागदपत्रे देण्यासाठी एजंट आरोपींकडून 20 ते 25 हजार रुपये घेत. गुन्हा कोणता आहे व त्यातील आरोपींची आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेत देखील जास्त पैसे घेतले जात. अटक आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली होती.

देशात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण; बरे होण्याचेही प्रमाणही...

अशी केली न्यायालयाची फसवणूक 
शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील विविध न्यायालये, लष्कर आणि पिंपरीमधील न्यायालयात सुरू असलेल्या चोरी, घरफोडी, दरोडा, पोक्‍सो यासारख्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळण्यासाठी बोगस आधारकार्ड, रेशन कार्डची झेरॉक्‍स, सात-बारा उतारा अशी खोटी शासकीय कागदपत्रे तयार केली जात. त्यानंतर त्याआधारे जामीन मिळवून देणारे एजंट आणि वकील आपसांत संगनमत करून बनावट जामीनदारांचे खोटे कागदपत्रे तयार करून ते खरे असल्याने भासवून न्यायालयाची फसवणूक करीत.

फरार होणारे आरोपीच टार्गेट 
एखाद्या गुन्ह्यात आरोपीला जामीन झाल्यानंतर पुढील तपासादरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार त्याने न्यायालयात हजर राहणे अपेक्षित असते. मात्र काही आरोपी जामीन मिळाल्यानंतर फरार होतात. तेव्हा जामीनदारांच्यामार्फत त्यांचा शोध घेतला जातो. मात्र बनावट जामीनदार दिल्यानंतर आरोपीचा शोध घेणे मुश्‍कील होते. त्यामुळे फरार होणारे आरोपी हे या एजंटाचे टार्गेट असतात.

जाहिरातींचे होर्डिंग पुणेकरांच्या जिवावर;अपघातांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्‍चित करा   

पोलिस करणार या मुद्यांचा तपास 
- कागदपत्रे असलेल्या मूळ व्यक्तींचा शोध घेतला जाणार
- एजंटांनी आरोपींकडून घेतलेल्या पैशाचे काय केले?
- आत्तापर्यंत कोणाकोणाला जामिनासाठी बनावट कागदपत्रे पुरवली
- जामीनाव्यतिरिक्त कोणत्या कामासाठी कागदपत्रांचा वापर
- एजंटांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com