नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्या तिघांचा जामीन अर्ज फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांचा जामीन अर्ज शनिवारी फेटाळण्यात आला.
             

पुणे : महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह तिघांचा जामीन अर्ज शनिवारी फेटाळण्यात आला.
             
रवींद्र हेमराज धंगेकर (वय 51, रा. लोणार आळी, रविवार पेठ), मंदार हेमंत पुरोहित ( वय  34) आणि अमित मोहन देवरकर ( वय 38, दोघेही रा. कसबा पेठ) यांना या प्रकरणात अटक  करण्यात  आली आहे.  अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे तिघे शुक्रवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजार झाले होते. त्यानुसार अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी पी.  डी. सवांत यांनी त्यांची एक दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.त्यामुळे त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
 

या प्रकरणात पूर्वी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या गुन्ह्यात धंगेकर यांचा पुढाकार असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने धंगेकर यांचा जामीन फेटाळला. पाषाण आणि कात्रज येथील तलावांमध्ये जलपर्णी नसतानाही 23 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याची टीका करून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात आंदोलन केले होते. त्यावेळी महापौरांनी आंदोलकांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना फोन करून आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. निंबाळकर यांनी निविदेबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. ही निविदा जादा दराने आल्याने ती रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. त्या दरम्यान धंगेकर यांनी निंबाळकरांना उद्देशून चोर आणि भ्रष्टाचारी म्हटले. त्यावर निंबाळकर यांनीही धंगेकर यांच्याकडे बोट करून मला चोर, भ्रष्टाचारी म्हणण्याची त्यांची लायकी आहे का? असे विधान केले. त्यानंतर झालेल्या वादात निंबाळकर यांना धक्काबुक्की झाली होती. या प्रकरणात शिंदे, धंगेकर यांच्यासह अन्य 15 ते 16 जणांवर गुन्हा दाखल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corporator Ravindra Dhangekar's three-pronged bail application is rejected