नगरसेवक जगताप यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोषारोपपत्र शुक्रवारी दाखल केले. या वेळी पोलिसांनी जगताप दांपत्याला अटक केली. दुपारी त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यांनी एक कोटी ३३ लाख ३९ हजार ५९२ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविली, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप, त्यांची पत्नी व तत्कालीन नगरसेविका उषा यांच्याविरुद्ध ४ मार्च २०१५ रोजी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे दोषारोपत्र उपअधीक्षक कांचन जाधव यांनी शुक्रवारी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दाखल केले. या वेळी सुभाष आणि उषा यांना अटक करण्यात न्यायालयात हजर करण्यात आले. जगताप हे १९९५ पासून २०१६ पर्यंत नगरसेवक होते. सध्या ते स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा त्यांच्याकडे एक कोटी ३३ लाख ३९ हजार ५९२ रुपयांची अधिक मालमत्ता आढळून आली आहे, असे पोलिसांनी न्यायालयात म्हटले आहे. जगताप दांपत्याने जामीनासाठी ॲड. एन. डी. पवार यांच्यामार्फत अर्ज दाखल केल्यावर न्यायालयाने तो मंजूर केला. 

माझ्याविरुद्ध कुभांड - जगताप
या बाबत सुभाष जगताप म्हणाले, ‘‘माझ्या सर्व संपत्तीची माहिती प्राप्तिकर विभागाला सादर केलेली आहे. त्याचा करही भरलेला आहे. जुन्या मिळकतींची बाजारमूल्याने वाढ गृहित धरून पोलिसांनी तपासात अपसंपदेचा ठपका माझ्यावर ठेवला आहे. तो चुकीचा आहे. त्याबाबत न्यायालयात मी माझे म्हणणे सादर करणार आहे. पोलिस तपासात झालेल्या चुका झाकण्यासाठी माझ्यावर हे कुंभाड रचण्यात आले आहे.’’

Web Title: Corporator subhash Jagtap arrested