दादा.... व्हेटो वापरा अन भाजपचा टिडीआरचा ठराव रद्द करा; कोणी केली मागणी?

Corporators Demand to Ajit Pawar Use veto and Cancel BJPs TDR
Corporators Demand to Ajit Pawar Use veto and Cancel BJPs TDR

पुणे ः शहरातील 2 हजार रस्त्यांपैकी 323 रस्त्यांचे रुंदीकरण करून त्यावर टिडीआर वापरून बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेला ठराव नगरविकास खात्याला सांगून रद्द करा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे दौऱ्या दरम्यान शुक्रवारी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शहरातील 323 रस्त्यांचे 6 ते 9 मीटरच्या 323 रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा ठराव महापालिकेत स्थायी समितीसमोर भाजपने आणला होता. उपमुख्यमंत्री पवार यांनी ठराविक रस्ते करण्याऐवजी शहरातील सगळेच रस्ते रुंद करा, असे सांगितले होते. परंतु, बहुमत असल्यामुळे भाजपने स्थायी समितीमध्ये हा ठराव मंजूर करून घेतला होता. त्यात शहरातील अन्य रस्त्यांचेही रुंदीकरण करण्याची उपसूचना मांडण्यात आली असून ती मंजूर झाली आहे, असे सांगण्यात येत आहे. परंतु, या उपसूचनेची अंमलबजावणी कितपत होईल, या बाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक साशंक आहेत. शहरातील सर्वच रस्त्यांचे रुंदीकरण करून ते 9 मीटरचे करण्याचा ठराव मंजूर झाला असता तर, संपूर्ण शहराला त्याचा उपयोग झाला असता. परंतु, आता निवडक रस्त्यांचे रुंदीकरण होणार असून आणि अन्य रस्त्यांसाठी पुन्हा स्थायी समितीसमोर यावे लागेल, अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना वाटत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

त्यामुळेच माजी महापौर आणि नगरसेवक प्रशांत जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे यांनी पवार यांना त्यांच्या दौऱ्या दरम्यान शुक्रवारी निवेदन दिले. त्यात स्थायी समितीने मंजूर केलेला ठराव रद्द करावा, त्यासाठी नगरविकास खात्यालाही सूचना द्याव्यात, असे म्हटले आहे. ठराविक बांधकाम व्यावसायिकांचे हित साधण्यासाठी स्थायी समितीने हा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे उपनगरांतील नगरसेवकांना अडचणी येणार आहेत. स्थायीच्या ठरावामुळे कोथरूडचे हित जोपासले जाणार आहे. त्यामुळे हा ठराव अन्यायकारक आहे. त्यामुळे तो तातडीने रद्द करावा, असेही त्यात म्हटले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हा ठराव रद्दच करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
-----------
चीनची ऑस्ट्रेलियाला धमकी; ऑस्ट्रेलियाने दिले जोरदार प्रत्युत्तर
----------
चिंताजनक ! कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता चौथ्या स्थानावर
----------
स्थायी समितीचा हा ठराव रद्द न झाल्यास महापालिकेत ठराविक बांधकाम व्यावसायिकांचे मक्तेदारी निर्माण होईल. शहराच्या कोणत्याही भागातील रखडलेला पुनर्विकास व्हायलाच पाहिजे, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे. परंतु, ठराविक रस्ते आणि ठराविक बांधकाम व्यावसायिक यांच्याच हितासाठी निर्णय घेणे हे चुकीचे आहे. महापालिकेत बहुमत असल्यामुळे भाजप त्याबाबत आग्रही आहे. परंतु, हा अन्याय राज्य सरकारने दुरुस्त करावा आणि त्यासाठी टिडीआरचा ठराव रद्द करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com