नगरसेविकेच्या पतीची महिलेकडून धुलाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पुणे  : वायफळ बडबड कशी अंगलट येते, याचा अनुभव नुकताच भाजपच्या एका नगरसेविकेच्या पतीला आला. पक्ष आणि राजकारणात कायम आक्रमक असलेल्या एका महिला लोकप्रतिनिधीबद्दल नको ते वक्तव्य केल्यामुळे संबंधित महिलेने या नगरसेविकेच्या पतीला घरी जाऊन बडविले. अशा प्रकारे तिसऱ्यांदा या महाशयांनी मार खाल्ल्यामुळे भाजपमध्ये सध्या हा विषय चर्चेचा झाला आहे. 

आठ ते दहा दिवसांपूर्वीची ही घटना आहे. संबंधित नगरसेविकेच्या पतीने लोकप्रतिनिधी असलेल्या एका ज्येष्ठ महिलेबद्दल नको ते विधान केले. त्याची माहिती मिळताच संबंधित महिलेने थेट त्या नगरसेविकेचे घर गाठले आणि त्यांच्यासमोरच त्यांच्या पतीराजाची धुलाई केल्याची चर्चा सध्या पक्षात सुरू आहे. तीन ते चार महिन्यांपूर्वी या पतीराजांनी त्याच महिलेच्या मुलीसंबंधी अशा प्रकारे वक्तव्य केल्यामुळे मार खाल्ल्याची चर्चा आहे. 
याच्याही आधी बाजीराव रस्त्यावर एका नगरसेवकाने पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोरच या महाशयांना चोप दिला होता.

Web Title: corporators husband trounce by ledy