Pune | कोरोना काळातही ठाकरे सरकारचा भ्रष्ट कारभार - माधव भंडारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना काळातही ठाकरे सरकारचा भ्रष्ट कारभार  - माधव भंडारी

पुणे : कोरोना काळातही ठाकरे सरकारचा भ्रष्ट कारभार - माधव भंडारी

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार दोन वर्षे पूर्ण झाले असून, कोरोनाचा सामना करण्यात आपले राज्य सर्वात पिछाडीवर राहिले. मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झालेल्या ८०० कोटी रुपये ही राज्य सरकारला खर्च करता आले नाही. आपत्ती निवारण निधीतून जमा झालेल्या २००० कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकारने कुठे खर्च केला हा प्रश्न आहे. कोरोना काळातही राज्य सरकारने भ्रष्ट कारभार केला, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला.

महाविकास आघाडीच्या द्विवर्षपूर्ती निमित्त भाजप कडून सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. भंडारी म्हणाले,"जनादेश धुडकावून फसवणुकीने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने कोरोनाकाळात भ्रष्टाचार, धोरणलकवा आणि ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत लोटल्याने कोरोनाविरोधी लढ्यातील सर्वात अपयशी राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली आहे.",

हेही वाचा: कचरा मुक्तीतून फुलली गच्चीवर बाग

कोरोना साह्य निधीच्या नावाने लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले, मात्र त्यापैकी जेमतेम २५ टक्के निधीचाच विनियोग केल्याची कबुली सरकारनेच दिली आहे. उर्वरित सहाशे कोटींचा निधी वापराविना पडून आहे. आणि कोरोनाचा फटका बसलेली जनता मात्र,आर्थिक विवंचनेमुळे त्रस्त आहे. ऊठसूठ पीएम केअर फंडावर डोळा ठेवून मदतीची याचना करणाऱ्या ठाकरे सरकारने हा पैसा दडवून कशासाठी ठेवला याची लोकायुक्तामार्फत चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रास वाऱ्यावर सोडून संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली. या अपयशास 'मी जबाबदार' असे नागरिकांकडून वदवून घेताना, स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षितता सांभाळत 'माझे कुटुंब एवढीच माझी जबाबदारी', असा बेजबाबदार बाणाही दाखविला, असा आरोप माधव भांडारी यांनी केला.

केंद्राने महाराष्ट्राला दिले :

केंद्र सरकारने गव्हासाठी २.७५ हजार कोटी, तांदळासाठी २ हजार ६२० कोटी, डाळीसाठी १०० कोटी, स्थलांतरासाठी १२२ कोटी असे एकूण ४ हजार ५९२ कोटींची मदत केंद्र सरकारने केली आहे. आपत्ती निवारण निधीतूनही २००० कोटी रुपये दिले आहेत. या निधीचा हिशोब जनतेला द्यावा असे भंडारी म्हणाले.

loading image
go to top