कचरा मुक्तीतून फुलली गच्चीवर बाग | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळजाई पठार येथील कडू दांपत्यानी ओल्या कचऱ्यापासून  गच्चीवर फुलवली बाग किसन कडू व सुरेखा कडू

कचरा मुक्तीतून फुलली गच्चीवर बाग

सहकारनगर (पुणे) : घरातील ओल्या कच-याचे खत बनवून त्याचा वापर गच्चीवर फूलबाग फुलवलेल्या कडू कुटूंबीयांनी कचरामुक्तीचा आदर्श परिपाक घालून दिला आहे.गावाकडे मिळालेला शेतीचा वारसा शहरात आल्यावर सुध्दा तसाच पुढा नेत तळजाई पठार येथील किसन कडू व सुरेखा कडू या शेतकरी दापत्याने घरातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करून गच्चीवर आकर्षक सुंदर बाग फुलवली आहे.

मूळचे पानशेत येथील कडू कुटुंब 30 वर्षापासून तळजाई पठार या ठिकाणी राहत असून हे एकत्र कुटुंब पद्धतीने शहरात राहत आहेत. कुटुंबात तीन मुले,तीन सुना आणि सहा नातवंडे सहित १५ व्यक्ती कुटुंबात एकत्रितपणे गुण्या गोविंदाने राहत आहेत.

हेही वाचा: Cricket | टीम पेनला ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक म्हणून संघाचा पाठींबा

शेतकरी कुटुंबानी घरातील रोजचा चार पाच किलो ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करून गच्चीवर बाग फुलवली आहे. यामध्ये मोगरा,जास्वंद,पिवळा गुलाब,लाल गुलाब,चाफा इ. फुले असून गच्चीवर कारली, पापडी, वांगी, शेंगा,टॉमेटो, गवती चहा,लिंब असा भाजीपाला पिकवला आहे. यावेळी किसन कडू (वय ७५ ) म्हणाले, मूळचा शेतकरी कुटुंबातील असल्याने पहिल्यापासून शेतीची आवड आहे. घरात एकत्र कुटुंब पध्द्तीने राहत असून गच्चीवर सकाळच्या वेळी झाडांना, फुलांना पाणी घालणे व निगा राखणे असे काम करीत दिवस भर यात मग्न राहून बागेची देखभाल करीत असतो. याचा आंम्हाला आनंद मिळतो.

पत्नी सुरेखा कडू (६७) म्हणाल्या, विविध प्रकारची फुले व पालेभाज्याची लागवड केली आहे.बागची देखभाल करीत आमचा दिवस जातो.त्यापासून मिळणारे भाजीपाला घरीच वापरत असतो तसेच जादा झाल्यास येणार्‍या पाहुण्यांचा पाहुणचार करून त्यातील काही निवडक वालपापडी,गवती चहा ,फुले देत असतो. यामध्ये नातवंडे यांचा ही सहभाग मिळतो यातून वेगळा आनंद कडू कुटुंबाला मिळत आहे म्हणून गच्चीवर सुंदर बाग फुलवली आहे.

loading image
go to top