'कॉसमॉस'ची रुपी बॅंक होऊ देऊ नका 

मुकुंदनगर - कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या रविवारी झालेल्या 112 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी झालेले सभासद.
मुकुंदनगर - कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या रविवारी झालेल्या 112 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी झालेले सभासद.

पुणे - "कॉसमॉस'ची रुपी बॅंक होऊ द्यायची नसेल, तर संचालक मंडळाने त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी सभासदांनी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या उपस्थितीत 112 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. कर्जवसुलीत अपयशी ठरल्याचे काळे यांनी सांगितले. या वेळी संचालक मंडळासमोर सभासदांनी गाऱ्हाणे मांडले. 

बॅंकेवर दरोडा टाकून हॅकर्स 94 कोटी लुटतातच कसे?, बॅंकेला 65 कोटींचा तोटा होतोच कसा?, एकाच व्यक्तीला तीन शाखांतून कर्ज मिळते कसे?, गणेशखिंड येथे कॉसमॉस टॉवर ही इमारत बांधायची काय गरज होती?, असे प्रश्‍न सभासदांनी उपस्थित केले. थकीत कर्जाच्या खऱ्या-खोट्याची खातरजमा करून कर्ज बुडव्यांची यादी जाहीर करा, दर तीन महिन्यांनी बॅंकेने वस्तुस्थितीचा अहवाल द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

काळे म्हणाले, ""सभासदांच्या प्रश्‍नांना संचालक मंडळाने उत्तरे दिली आहेत. मात्र, हजारो कोटींच्या व्यवहारात कर्ज प्रकरणाचा तपशील तपासून पाहावा लागेल. न्यायालयीन प्रकरणांबाबतही हेच करावे लागेल.'' 

संचालक तुपाशी आणि सेवकवर्ग उपाशी, अशी बॅंकेची अवस्था झाली आहे. एका वेटरच्या नावावर ऑडी गाडी घेण्यासाठी 75 लाख रुपयांचे कर्ज दाखविले आहे. संचालकांच्या नातेवाइकांचे कर्ज का वसूल होत नाहीत, याचे उत्तर प्रत्येक संचालकाने दिले पाहिजे. 
- विजय कुलकर्णी, सभासद, बारामती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com