Baramati News : औद्योगिक वीज जोडणीचा खर्च आता महावितरण करणार - सुनिल पावडे

शेती वगळता कोणत्याही नवीन वीज जोडणीसाठी आता ग्राहकाने खर्च करण्याची गरज नाही. यापुढे वीज जोडणीचा सर्व खर्च महावितरण स्वत: करणार.
Mahavitaran
Mahavitaranesakal

बारामती - शेती वगळता कोणत्याही नवीन वीज जोडणीसाठी आता ग्राहकाने खर्च करण्याची गरज नाही. यापुढे वीज जोडणीचा सर्व खर्च महावितरण स्वत: करणार असून, ग्राहकांनी फक्त कोटेशनची रक्कम भरावी असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी केले आहे. ऊर्जा भवन बारामती येथील औद्योगिक ग्राहकांसाठी सुरु केलेल्या ‘स्वागत कक्षा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

बारामती, केडगाव व सासवड विभागातील सर्व औद्योगिक ग्राहकांना गतिमान वीज सेवा देण्यासाठी बारामती येथील ऊर्जा भवन येथे महावितरणने ‘स्वागत कक्ष’ स्थापन केला आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे व बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. 12) करण्यात आले.

पावडे म्हणाले, औद्योगिक ग्राहकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात तसेच त्यांना छोट्या-मोठ्या कामांसाठी कार्यालयात येण्याची गरज भासू नये, याकरिता हा ‘स्वागत कक्ष’ काम करणार आहे. नवीन कनेक्शनची माहिती असो किंवा नावात बदल, भार बदल, वीजबिलाची तक्रार प्रत्येक बाबतीत हा कक्ष ग्राहकांना मदत करणार आहे.

उद्योजकांनी swagatcell_baramati@mahadiscom.in या ईमेलवर किंवा ७८७५७६८०२७ व ७८७५७६८०५० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास महावितरण स्वत:हून ग्राहकांना फोन करुन अथवा जागेवर भेट देऊन पुढील कार्यवाहीसाठी मदत करणार आहे. काम होण्यासाठी लागणारा खर्च आणि वेळ याची माहिती सुरुवातीलाच दिली जाईल.

बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार म्हणाले, ‘स्वागत कक्षा’मुळे वीज सेवा आणखी गतिमान होतील. बारामती येथील उद्योजकांसाठी महावितरणने ‘ब्रेक डाऊन व्हेईकल’ उपलब्ध केली आहे. ही सेवा अतिशय जलद असून, महावितरणची टीम अतिशय कमी वेळेत जागेवर पोहचून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी काम करत आहे.

कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता म्हसू मिसाळ व संजय सोनवलकर, उद्योजकांतर्फे संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनिल अवचट, ॲड. ए. एल. शेख, हरिश खाडे, विष्णू दाभाडे, महादेव गायकवाड, राजन नायर, हरिभाऊ थोपटे, संभाजी माने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप सुरवसे यांनी केले.

कटफळ व मुडाळे येथे नवीन वीज उपकेंद्र -

कटफळ येथे महावितरणचे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्र होणार असून, यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या एमआयडीसीला व परिसरातील उद्योजकांना अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे. पणदरे येथील औद्योगिक वसाहतीला सध्या ज्या उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो त्या वाहिनीचे अंतर मोठे आहे.

त्यामुळे वीजपुरठा खंडित झाल्यास त्याचे निराकरण करण्यास वेळ लागतो. त्याकरिता मुडाळे येथे २२० केव्हीचे अतिउच्चदाब वीज उपकेंद्र होणार असून, हे उपकेंद्र झाल्यास पणदरे उपकेंद्राच्या समस्या निकाली निघतील अशी माहिती मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com