ड्रोनद्वारे 40 हजार गावांची मोजणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुणे : पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी या गावची मोजणी ड्रोनच्या साह्याने करण्याचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील चाळीस हजार गावांची मोजणी याच पद्धतीने करण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने दिला आहे. त्यास राज्य सरकारने मान्यता दिल्यास प्रथमच या गावांच्या गावठाणांची जलदगतीने व अचूक मोजणी शक्‍य होणार आहे. तसेच ड्रोनद्वारे मोजणी करणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. 

- सध्या ईटीएस मशिनच्या माध्यमातून जमीन मोजणीचे काम. मात्र त्यास लागणारा कालवधी मोठा. 
- त्या पार्श्‍वभूमीवर सोनोरीत ड्रोनच्या साह्याने मोजणीचा पहिला प्रयोग यशस्वी. 
- त्यातील अचूक व आणि पारदर्शक पद्धतीच्या मोजणीमुळे राज्यातील 40 हजार गावांच्या गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा राज्य सरकारला प्रस्ताव. 
- 50 वर्षांत राज्यातील 43 हजार गावांपैकी केवळ तीन हजार गावांचीच मोजणी पूर्ण 
- सरकारने मान्यता दिल्यास ड्रोनद्वारे अवघ्या तीन वर्षात 40 हजार गावांची मोजणी शक्‍य. 

या मोजणीचे फायदे 
-कमी वेळेत अचूक मोजणी 
-जागामालकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार 
-मालकी हक्काचा ठोस पुरावा निर्माण होणार 
-बॅंका अथवा अन्य संस्थांकडून कर्ज मिळणे सोयीचे होणार 
-ग्रामपंचायतींच्या मिळकत करात वाढ होण्यास मदत 
-जमिनीचे वाद संपुष्टात येण्यास मदत 

प्लेन टेबल अथवा ईटीएस मशिनच्या माध्यमातून मोजणी केल्यानंतर जमिनीवरील परिस्थिती आणि कागदावरील मोजणीत वीस ते पंचवीस सेंटीमीटरचा फरक पडतो. परंतु ड्रोनच्या माध्यमातून मोजणी केल्यास केवळ चार ते आठ सेंटीमीटरचा फरक पडतो. याशिवाय अचूक आणि जलदगतीने मोजणी पूर्ण होते. सोनोरी गावात ईटीएस आणि ड्रोन या दोन्हींच्या साह्याने मोजणी केल्यानंतर हे स्पष्ट झाले. 
एस. चोक्कलिंगम, आयुक्त, जमाबंदी 

Web Title: Counting of 40 thousand villages by drone