ड्रोनद्वारे एका दिवसात मोजणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे - सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनद्वारे गावठाणांमधील मिळकती व जागेची मोजणी करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव भूमी अभिलेखने राज्य सरकारकडे पाठविला आहे. जमीन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर होणार आहे. त्यामुळे फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करणे शक्‍य होणार आहे.

भूमी अभिलेखकडून जमीन मोजणीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत जमीन मोजणीसाठी ईटीएस मशिनचा वापर करण्यात येतो. या मशिनमुळे दहा ते पंधरा दिवसांत मोजणी होण्यास मदत होते. मात्र आता भूमी अभिलेखने त्याही पुढे जाऊन ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यासाठी पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी गावाची निवड करण्यात आली होती. या गावातील गावठाणाची मोजणी ड्रोनद्वारे केली. यासाठी एक दिवस आधी भूमी अभिलेख विभागाने पूर्वतयारी केली होती. घरमालकांना सीमाचिन्ह देण्यात आले होते. ड्रोनद्वारे केलेल्या मोजणीच्या अचूकतेची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार हा प्रयोग यशस्वी झाला. 

Web Title: Counting by drone in one day

टॅग्स