माळशेज घाटातील अपघातात पारनेरच्या दांपत्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सरळगाव (मुरबाड) - कल्याण-नगर या राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाटात एसटी बस व मोटार यांच्या अपघातात एका दांपत्याचा मृत्यू झाला. शिवराम पांडुरंग नवले आणि सुमनबाई शिवराम नवले (रा. पारनेर) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले दांपत्य हे त्यांचे नातेवाईक गणेश वाफारे याच्यासह मोटारीने कल्याणला जात होते. अळे फाट्याकडे जाणाऱ्या अर्नाळा आगाराच्या एसटी बसने माळशेज घाटात त्यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. यात नवले दांपत्य जागीच ठार झाले; तर गणेश जखमी झाला. अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला, गाडीचा पुढील भाग कापून शिवराम नवले यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली.

Web Title: couple death in accident