पती-पत्नीस मोटारसायकलस्वारांनी लुटले

दत्ता म्हसकर
बुधवार, 9 मे 2018

जुन्नर (पुणे) : तोंडाला मास्क लावलेल्या चौघांनी रात्रीच्या वेळी स्कुटरवरून जात असलेल्या पती-पत्नीस रस्त्यात अडवून त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने, मोबाईल संच व एटीएम कार्ड काढून घेऊन पोबारा केला आहे. ही घटना सोमवारी (ता.७) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव सिद्धनाथ (ता.जुन्नर) जवळ घडली.

याबाबत प्रमोद यशवंत ठोंबरे (वय ४५ रा.पिंपळगाव सिद्धनाथ, पानसरेवाडी) यांनी मंगळवारी (ता.८) तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली.

ठोंबरे हे ओझर येथील विवाह सोहळा आटोपून घरी परतत असताना जुन्नर-मढ रस्तावरील पिंपळगाव- सिद्धनाथ जवळील देवशेत येथे रस्ता खराब असल्याने हळू हळू जात असताना पाठीमागून दोन काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकल वरून आलेल्यानी त्यांना पुढील व मागील बाजूने अडविले दागिने काढा अशी धमकी दिल्याने ठोंबरे यांच्या गळ्यातील सहा हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल, एटीएमकार्ड, वाहन परवाना तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील दहा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसुत्र घेऊन लेण्याद्री रस्त्याने पोबारा केला. त्यांनी तोंडाला मास्क लावला असल्याने चेहरे ओळखता आले नाहीत मात्र त्याचे वय अंदाजे ३०-३५ असावे. एका चोरट्याने चौकटीचा शर्ट व जीन पॅन्ट घातली होती.अंधारामुळे पूर्ण वर्णन समजले नाही तसेच मोटारसायकलचा नंबर दिसला नाही तर एका गाडीस नंबर नसल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

या परिसरात यापूर्वी अशा घटना घडल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

Web Title: a couple looted by two wheeler drivers