Video : वन्यप्राण्यांचा आशिर्वाद घेत संदेश-ज्योती विवाहबंधनात

किशोर कुदळे
रविवार, 24 मे 2020

संदेश भुजबळ व रानमळा येथील ज्योती कुदळे यांचा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला. यावेळी सोहळ्याच्या खर्चातुन सामाजिक 
बांधलकी जपत या नवदांपत्याने वाल्हे व जेजुरी परिसरातील वन्यप्राण्यांसाठी वनविभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या पाणवठ्यामध्ये पाण्याचे टँकर देऊन भावी वैवाहिक जीवनासाठी जणू वन्य जीवांचा आशिर्वादच घेतला

वाल्हे : कोरोनामुळे सध्या अनेक लग्न अत्यंत साध्या पद्धतीने पार पडत आहेत. तसाच एक विवाह सोहळा आज पार पडला असून वाल्हे (ता. पुरंदर) येथील संदेश भुजबळ व रानमळा येथील ज्योती कुदळे यांचा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला. यावेळी सोहळ्याच्या खर्चातुन सामाजिक 
बांधलकी जपत या नवदांपत्याने वाल्हे व जेजुरी परिसरातील वन्यप्राण्यांसाठी वनविभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या पाणवठ्यामध्ये पाण्याचे टँकर देऊन भावी वैवाहिक जीवनासाठी जणू वन्य जीवांचा आशिर्वादच घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तोंडास मास्क बांधुन सोशल डिस्टन्सिंग पाळत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रानमळा येथे झालेल्या या विवाहावेळी नवदापत्यांनी सोहळ्याचा खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपत वन्य प्राण्यांची तहान भागविण्याचा निर्णय घेत वाचवलेली रक्कम नव दांपत्यांच्या
हस्ते जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. ती रक्कम जेजुरीच्या जयमल्हार फाऊंडेशनचे वन्यजीव मित्र विशाल बारभाई यांच्याकडे वाल्हे व जेजुरी परिसरातील वन्यप्राण्यासाठीच्या पाणवठ्यामध्ये पाणी देण्यासाठी खर्च करण्यास दिली जाणार असल्याची माहिती माने यांनीयावेळी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान कोरोनापासुन प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या सुचनांचे पालन करण्यात आले. लॉकडाऊन कायम असल्याने दुपारी अतिशय साध्या पद्धतीने ना मंडप, ना वाजंत्री, ना घोडा जेमतेम मंडळीच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा रानमळा येथे संपन्न झाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करीत अतिशय कमी खर्चात साध्या पद्धतीने कमी वेळात विवाह झाल्याने समाजात यापुढेही अशा पद्धतीने होणाऱ्या विवाह सोहळ्याचीच गरज असल्याची प्रतिक्रिया अंकुश माने यांनी व्यक्त केली.

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर कोणासाठी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The couple provided water for the animals