esakal | ...तर मग संमतीनेच घटस्फोट घेऊ; कोरोनाने बदलला जोडप्यांचा कल!
sakal

बोलून बातमी शोधा

Couple

अर्जदारांमधील वादाचे स्वरूप कसे आहे, त्यांना वेगळे राहत असलेल्याला किती दिवस झाले आहेत, विभक्त न झाल्याने त्याची महत्त्वाची कामे अडली आहेत का?

...तर मग संमतीनेच घटस्फोट घेऊ; कोरोनाने बदलला जोडप्यांचा कल!

sakal_logo
By
सनील गाडेकर

पुणे : एकतर्फी दावा दाखल केला तर सध्या त्यावर जलद सुनावणी होणार नाही. त्यामुळे आपला विभक्त होणाचा प्रवास आणखी काही महिने किंवा वर्ष वाढू शकतो. त्याऐवजी आपण संमतीने घटस्फोटासाठी अर्ज करू. दावा लवकर निकाली लावण्यासाठीचे कारण न्यायालयाला पटवून देऊ आणि वेगळं होऊ, अशी मानसिकता घटस्फोटाच्या तयारीत असलेल्या अनेक जोडप्यांची झाली आहे.

- Success Story : २१ व्या वर्षी तो बनला न्यायाधीश!

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या कौटुंबिक न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे उशीर झाला तरी चालू शकते अशा दाव्यांना तारीख देण्यात येत आहे. एकतर्फी घटस्फोटाच्या अर्जात काही घाई नसेल, तर त्यांना देखील लांबच्या तारखा देण्यास प्राधान्य आहे. त्यामुळे घटस्फोटाचा एकतर्फी दावा दाखल केला, तर त्यावर लवकर सुनावणी होईल याची शाश्‍वती नाही. या सर्वांचा विचार करत संमतीने दावा करण्याचा मार्ग निवडला जात आहे. घटस्फोट घेण्यापूर्वी या जोडप्यांतील वाद देखील चर्चेतून मिटवले जात आहेत. अन्यथा तीच दांपत्य कोरोनाची परिस्थिती नसती, तर त्यांच्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी न्यायालयात गेली असती.

Positive Story : मी आत्महत्याच करणार होतो, पण तेवढ्यात... (व्हिडिओ)​

दावा अर्जंट असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न :
अर्जदारांमधील वादाचे स्वरूप कसे आहे, त्यांना वेगळे राहत असलेल्याला किती दिवस झाले आहेत, विभक्त न झाल्याने त्याची महत्त्वाची कामे अडली आहेत का? त्यांना सुनावणींना हजर राहणे शक्‍य होणार नाही का? यासह इतर महत्त्वाच्या बाबींवरून न्यायालय प्रकरण किती अर्जंट आहे, हे ठरवते आणि त्यावर जलद निर्णय देते. त्यामुळे आमचे प्रकरण किती अर्जंट आहे, हे न्यायालयाला पटवून देण्याचे प्रयत्न ही जोडपी करीत आहेत.

बाळासाहेबांच्या वेळी राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत पण आता पुण्यात : संजय राऊत

न्यायालयात सध्या केवळ तत्काळ प्रकरणांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे आपले प्रकरण तत्काळ निकाली लागणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद करण्याचा अर्जदारांचा आग्रह आहे. न्यायालय त्यावर योग्य ते निर्णय घेत आहे. सर्व सुनावणींचा विचार करता सध्या परस्पर संमतीने दाखल केलेले दावे देखील प्रलंबित राहत आहेत. मात्र भविष्यातील वाद टाळत वेळ वाचविण्यासाठी संमतीने अर्ज करण्याकडे जोडप्याचा कल सध्या दिसतो. दाव्यांच्या स्थितीचा विचार करता न्यायालयीन कामकाज वाढविणे गरजेचे आहे.
- प्रशांत वाटविसावे, कौटुंबिक न्यायालयातील वकील

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)