esakal | 'त्या' निवृत्त पोलिस निरीक्षकाचा जामीन फेटाळला; दारुच्या नशेत कारने उडवले होते ५ जणांना
sakal

बोलून बातमी शोधा

Court-Bail

आरोपी पोलिस खात्यात उच्च पदावर कार्यरत होता. त्याचा गैरफायदा घेऊन साक्षीदारावर दबाव आणण्याची शक्‍यता आहे. आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होईल, असा युक्तिवाद ऍड. बोंबटकर यांनी केला.

'त्या' निवृत्त पोलिस निरीक्षकाचा जामीन फेटाळला; दारुच्या नशेत कारने उडवले होते ५ जणांना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दारूच्या नशेत कार चालवताना झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू आणि तिघे जखमी झाल्याप्रकरणी न्यायालयाने निवृत्त पोलिस निरीक्षकाचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी हा आदेश दिला. संजय निकम असे या निवृत्त पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. निकम हा दारूच्या नशेत कार घेऊन जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.

आधी रस्त्यावरील खड्डे बुजवा; सांगवीकरांनी केली मागणी

याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी या अर्जास विरोध केला. दारू पिऊन कार चालवताना अपघात होऊन कुणाला इजा होईल आणि जीव जाईल याची कल्पना असतानाही त्याने बेदरकारपणे कार चालवली. त्यामुळे दोघांना जीव गमवावा लागला आहे. आरोपी पोलिस खात्यात उच्च पदावर कार्यरत होता. त्याचा गैरफायदा घेऊन साक्षीदारावर दबाव आणण्याची शक्‍यता आहे. आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होईल, असा युक्तिवाद ऍड. बोंबटकर यांनी केला.

पुणेकरांच चाललंय काय? फक्त ९ दिवसांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांकडून केला दीड कोटी रुपयांचा दंड वसूल​

आज आणखी एकाचा मृत्यू :
बालेवाडी येथील ममता चौकात रविवारी (ता.6) हा प्रकार घडला होता. या अपघातात संतोष राठोड (वय 35, रा. काळेवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर राजेश सिंग (वय 37, रा. ताथवडे) यांचा चिंचवड येथील एका खासगी रुग्णालय उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा आता दोन झाला आहे. तर तिघे जखमी आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top