न्यायालय आवारात वकिलांनीच केला आरोपीवर हल्ला

003Court_Decision_h_8_0_3.jpg
003Court_Decision_h_8_0_3.jpg

पुणे : अॅड. देवानंद ढोकणे यांच्यावर गोळीबार करणारया आरोपी कुमारदास बढे याला पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेऊन न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींपैकी बढे याला आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांच्या न्यायालयात हजर केले होते. तर विधीसंघर्षग्रस्त बालकाला बालगृहात पाठवण्यात आले आहे. दरम्यान आरोपी बढे याला न्यायालयाच्या आवारात काही वकिलांनी मारहाण केली होती. 

सोमवारी (ता.22) रात्री साडेआठ वाजता कारमधून जात असलेल्या अॅड. देवानंद ढेकणे (रा. येरवडा) यांच्यावर संगमवाडी येथे पिस्तुलातून गोळीबार केला. काल वकील ढेकणे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. कुरुमदास कालूराम बढे (वय 33, रा. कालूस, पवलेवाडी, ता. खेड) सह एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले होते. जमिनीच्या वादावरुन बढे याने गोळीबार केल्याची माहिती समोर आली. बढ़े आणि त्यांच्या चुलत्याचे जमीनीवरुन वाद चालू होते.

दरम्यान वकील ढेकणे यांच्यावर झालेल्या गोळीबारा निषेधार्थ पुणे शहरातील वकीलांनी काल आंदोलन केले होते. आज आरोपी बढे याला न्यायलयात सुनावनीसाठी हजर केले होते. दरम्यान न्यायलयात आवारातच संतप्त वकिलांच्या जमावाने त्याच्यावर हल्ला करुन मारहाण करण्यास सुरवात केली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेची अधिक काळजी घेत त्याला येरवडा कारागृहात पाठवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com